महापारेषणमध्ये दक्षता जनजागृती सप्ताह साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे यांच्या हस्ते उपस्थित अधिकारी व कर्मचाºयांना भ्रष्टाचार निर्मूलन प्रतिज्ञा देण्यात आली. प्रतिज्ञेनंतर मा. राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात आला. सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे संचालक (मा.सं.) श्री. सुगत गमरे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा व अंमलबजावणी) श्री. कैलास कणसे, मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. संतोष आंबेरकर, मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) श्री. सुधीर वानखेडे, मुख्य अभियंता श्री. पीयूष शर्मा, उपमुख्य दक्षता अधिकारी श्री. प्रशांत गोरडे, महाव्यवस्थापक (मा.सं.मनुष्यबळ नियोजन) श्री. राजू गायकवाड, उपमहाव्यवस्थापक (मा.सं.) श्री. अभय रोही, अधीक्षक अभियंता (प्रशिक्षण) श्री. संजीवकुमार बड्डेला, अधीक्षक अभियंता श्री. अमित नाईक, कार्यकारी अभियंता (दक्षता) श्रीमती सुचेता सिंग, श्री. महेश आंबेकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *