कंत्राटीकरण विरोधात युवकांचा जनआक्रोश मोर्चा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : राज्य सरकारने सुरु केलेले खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करण्यासह विविध मागण्यासाठी आज ३१ मार्च रोजी संयुक्त युवा छात्र संघ व संयुक्त समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोष मोर्चा काढण्यात आला. राज्य शाससनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने ६ सप्टेंबर २०१३ रोजी निर्गमित केलेल्या निर्णयानुसार, शिक्षण व विविध विभागात मनुष्यबळ बाह्य यंत्रमार्फत पुरविण्यात येणार आहे. हा शासन आदेश तात्काळ रद्द करुन सर्व विभागातील रिक्त जागेवर कायमस्वरुपी पदभरती करावी, दत्तक शाळा योजनेचा शासन निर्णयद्द करणे, राज्य कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करणे, इतर विभागाकडून घेण्यात येणान्या स्पर्धा परिक्षेचे शुल्क कमी करुन १०० रुपये करण्यात यावे, खासगी संस्थामार्फत विविध पदाच्या स्पर्धा परिक्षा न घेता सर्व परिक्षा आयोगाद्वारे घेण्यात याव्या, शासकीय पदभरतीसाठी होणाºया स्पर्धा परिक्षेतील पेपर फुटीवर नियंत्रणासाठी कडक कायदा करण्यात यावा, समूह शाळा संकल्पना रद्द करावी. राज्य शासनातील शासकीय कार्यालयातील रिक्त पदे व अनुदानीत संस्थेमधील शिक्षक व प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरावी आदी मागण्यांचा घेऊन इंदिरा गांधी स्टेडियमपासून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *