शहीद लिल्हारे यांना तिरोडावासी यांची आदरांजली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : महालगाव येथील देवीप्रसाद (मुन्ना) लील्हारे या जवानाचा ३ आॅक्टोंबर रोजी हिमाचल प्रदेश शिमला येथे मृत्यू झाल्याने त्याचे अंतिम संस्कारा करता त्याचे शव महालगाव येथे आज दिनांक ५ रोजी तिरोडा मार्गाने नेण्यात आले असता तिरोडा येथील सुकडी नाका येथे आमदार विजय कुमार रहागंडाले, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र रहागंडाले यांचे सह माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे सैनिक यांचे तर्फे शव पेटीला पुष्पहार अर्पण करून, करिष्मा टी पॉईंट, पोलीस स्टेशन, राणी अवंतीबाई पुतळा, सी.जे.पटेल कॉलेज मार्गावर शहीद मिश्ररा विद्यालयाचे एनसीसी पथक, गिरजाबाई कन्या शाळा, एसडीबी विद्यालय, श्री पब्लिक स्कूल, सी जे पटेल महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनसह दुतर्फा नागरीकांनी हातात तिरंगी झेंडे घेवून विर जवान देवीप्रसाद अमर रहे, भारत माता की जय असे नारे देत आदरांजली वाहिली. त्यानंतर विर जवान देवीप्रसाद लिल्हारे यांची शवयात्रा तिरोडा -परसवाडा मार्गाने त्यांच्या स्वगावी महालगाव कडे रवाना झाली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *