भयंकर आगीत मेदीपूर येथील लालचंद चचाने यांचे घर स्वाहा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील मेंदीपूर येथील लालचंद चाचणी यांचे घर आगीत स्वाहा झाले असून त्यांची निकट परिवारातील त्याच्याने परिवाराचे दोन घरांना आजीची झळ पोहचून सुमारे ७ लक्ष ६५ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज तलाठी यांचे पंचनाम्या प्रमाणे वर्तवण्यात आला असून शासनातर्फे या परिवारांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी गावकºयांनी केली आहे. दिनांक ९ तारखेचे रात्री ८ वाजता दरम्यान मेंदीपूर येथील लालचंद हरिचंद चचाने यांचे परीवाराची सर्व ६ सदस्य गावातील मसकरया गणपतीचे आरती करता गेले असता अचानक त्याचे घराला आग लागल्याचे लक्षात येताच गावकºयांनी धाव घेऊन मिळेल त्या साधनाने व घरगुती मोटार पंपाने आग विझवण्याचा प्रयत्न करत अदानी प्रकल्पास आग लागल्याची सूचना दिल्यावरून अदानी प्रकल्पाचे २ अग्निशमन यंत्र ही घटनास्थळी पोहोचले मात्र लालचंद चचाने यांचे संपूर्ण घर व घरातील कपडा लत्ता गहू तांदूळ व जिवनोपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले. मात्र प्रसंगा सावधान राखून गावातील काही युवकांनी घरातील गॅस सिलेंडर जीवाची पर्वा न करता बाहेर काढल्याने आणखी मोठा अनर्थ टळून कूठलीही जीवित हानी झाली नाही. या आगीची माहिती तलाठी राजेश भीवगडे यांना होताच त्यांनी घटनास्थळ गाठुन केलेल्या पंचनाम्या प्रमाणे लालचंद यांचे घराचे आगीत ६ लक्ष ४५ हजार व शेजारील प्रमिला दसाराम चचाने यांचे घराचे ४५ हजार तर संदेश मूलचंद चचाने यांचे घराचे ७५ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला असून गावकºयांनी तिन्ही नूकसान ग्रस्तांना शासकीय मदत देण्याची मागणी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *