भात पिकावर नैसर्गिक आपदा

आशा वैद्य / भंडारा पत्रिका जांभोरा/करडी : भात (धान) पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात या घडीला आदी पुराच्या पाण्याखाली हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली तर आता हलके भारी भात (धान) पिकाला करपा, तुडतुडा, मावा आदी विविधा नैसर्गिक रोगाने ग्रासले आहे. एकूणच होत्याचे नव्हते झाले आहे. त्यामुळे कर्ज काढून शेत पिक डौलाने उभे केलेल्या भात पिकविणाºया शेतकरी पुढे नैसर्गिक व आर्थिक संकट उभे आले आहे तेव्हा सरकार मायबाप भात पिकविणाºया शेतकºयाकडे लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे. प्राप्त माहिती वरून लहान मोठ्या ७३६ तलावाच्या भंडारा जिह्यात भात पिक जवळपास १ लक्ष १५ हेक्टर जागेत घेतले जाते. भात पिकाला पोषक असलेल्या वनसंपदा आणि मुबलक पाण्यामुळे या जिल्ह्यात भातपीक मोठ्या प्रमाणात उभे केले जाते. पण भात पिकाची शेतीही आता बिन भरवशाचीराहिली आहे. निसर्ग या ना त्या कारणामुळे भातपिकाच्या शेतीला नासवंत बनवू लागला आहे. या वर्षाला आगस्त सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर भात पिकाचे शेतातून पाणी गेल्याने पिक आजमितीला दिसूनही पिकाचे उत्पादनात घट झाली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *