गोंदिया जिल्हयात आलेली भाजपची ओबीसी जागर यात्रा टाय टाय फिस्स

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : देशात व राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना यावर विरोधी पक्षांकडून भाजप वर सातत्याने होत असलेला टिकेचा भडिमार हे पाहून राज्यातील भाजपतर्फे ओबीसी जागर यात्रेचा आयोजन करण्यात आलेला आहे. पण केंद्रातील गेल्या ९ वर्षात ओबीसी चा मुद्दा निकाली काढू न शकलेल्या भाजप वर आता ओबीसी बांधवांचा विश्वास राहिला नाही की काय याची प्रचिती ६ आॅक्टोबरला गोंदिया जिल्हयात आलेल्या भाजपच्या ओबीसी जागर यात्रेतून दिसून आली. या यात्रेचा भाजपकडून प्रचार प्रसार करूनही ओबीसी बांधवांनी या यात्रेकडून आपली पाठ फिरविल्याचेच दिसून आले. गोंदियातील जयस्तंभ चौकातून काढलेल्या रैलीत सामसूम दिसून आला. त्यानंतर गोंदियातील एका सभागृहात भरविलेल्या सभेत ही, ही भाजपची ओबीसी जागर यात्रेची सभा की भाजपचा पदाधिकारी मेळावा अशीच चिन्हे दिसून आली. या ओबीसी जागर यात्रेत सहभागी झालेले भाजप चे महाराष्ट्र ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, माजी आ. आशिष देशमुख व गोंदिया-भंडारा चे खासदार सुनिल मेंढे, तिरोड्याचे आ. विजय रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांना पण सभागृहातील उपस्थिती पाहून भविष्यातील चित्र समजू शकेल अशीच परिस्थिती येथील जलाराम सभागृहात निर्माण झाली होती.

सभा सुरू झाल्यानंतर वक्त्यांनी भाजपनी ओबीसी करिता काय काय केले याचा पाढा वाचण्यापेक्षा मोदी पुराण कडे अधिक भर दिल्यामुळे उपस्थितांनी कटांळवाना होवून सभागृहातून बाहेर राहणेच अधिक पसंत केले असल्याचे सभागृहातील रिकाम्या खुर्च्या पाहून दिसून आले. खासदार सुनिल मेंढे यांनी ही आपण मागील ५ वर्षात काय केले हे सांगणे सोडून ९ वर्षात मोदींनी काय केले हेच सांगणे महत्वाचे समजले. लोक सभागृह रिकामे करित आहेत हे पाहून आपल्या अध्यक्षीय भाषणाकरिता आलेल्या माजी आ. आशिष देशमुख यांनी पण आपल्या भाषणातून या जिल्हयातील काँग्रेस नेते नाना पटोले हे कसे ओबीसी विरोधी भूमिका निभावतात. याकडे आपल्या भाषणाचा ओघ राखला आणि सभागृह रिकामे होतानी बघताचा त्यांनी आपले भाषण संपुष्टात आणले. नुकतेच राज्यातील ठिकठिकाणी ओबीसींचे मोर्चे आंदोलने झाली त्यात नेतृत्व करणाºयांकडून निघालेला एक सूर असा होता की विद्यमान राज्य वा केंद्र सरकार ओबीसी बांधवांचा उद्धार करू शकत नाही हे गोंदिया जिल्हयात पण झालेल्या ओबीसी जनआक्रोश आंदोलनातील वक्तयांचा सूर होता. त्यामुळे आता ओबीसींनाही कडून चुकले आहे की भाजप आपल्याला कधीही तारू शकत नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांनी राज्यातील नेतेमंडळी या ओबीसी जागर कार्यक्रमात आली असून सुद्धा याकडे पाठ दाखविली असल्याचे असू शकते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *