किटकनाशकांची फवारणी करताना शेतमजूराचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी खापा/तुमसर : सध्या शेतामध्ये हलक्या व भारीधानाला कडी करपा तुडतुळा व इतर रोगाने ग्रासले असून शेतकरी वर्ग त्या शेतावर कीटकनाशकांची फवारणी करण्याकरिता गावातील व परिसरातील शेतमजूरांमार्फत शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी करीत असतो त्यातच तुमसर तालुक्यातील खरबी येथे धान पिकावर फवारणी करीत असताना विष बाधा होऊन शेतमजुराच्या मृत्यू झाले. धानावर औषधी फवारणी करून घरी आल्या नंतर उलटी होऊ लागल्याने तात्काळ जिल्हा रुग्णालय भंडारा उपचारा करिता नेण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मृताचे नाव जंयता सिताराम सिंदपुरे (४८) रा. खरबी असे आहे. जयवंत हा औषधी फवारणी करिता दुसºया शेतकºयाच्या शेतीवर गेला होता. औषधी फवारणी करून घरी आला असता तो उलट्या करून लागला.

प्रथम त्याला तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखविण्यात आले, परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालय भंडारा येथे उपचार करण्याकरिता नेण्यात आले. त्याच्यावर दोन दिवस उपचार सुरू असताना काल त्याची प्राणज्योत मावळली. त्याच्या मागे आई-वडील, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा आप्त परीवार आहे त्याच्या मृत्यूनू गावात हळहळ व्याक्त होत आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात धानाला रोगाने ग्रासले असून शेतकरी कीटकनाशक फवारणी करीत आहेत. कृषी विभागाने कोणत्याही प्रकारची फवारणी करताना घ्यावयाची काळजी याची मार्गदर्शन शेतकºयांना केले नाही. कीटकनाशक फवारणी करत असताना सुरक्षा किट कृषी विभागामार्फत कृषी केंद्रामध्ये उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्यामुळे फवारणी करीत असताना शेतकºयांचा वीष बाधा होऊन मृत्यू होत असल्याचा आरोप येथील शेतकरी बांधवांनी केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *