सातोना ते नेरी रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करा

भंडारा पत्रिका/वार्ताहर सातोना : सातोना ते नेरी रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण उखडून रस्त्यावर खड्डे पडल्याने वाटसरू, सायकलस्वार, दुचाकी व चारचाकी वाहनधारक प्रवाशी नागरिकांना प्रवास करतांना त्रास दायक ठरत असल्याने प्रवाशी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून शासन प्रशासनाच्या सबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन सातोना ते नेरी रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्याची मागणी सातोना परिसरातील नागरिकांनी केली आहे. सातोना ते नेरी रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्यावरून हरदोली, आंधळगाव, मोह- ाडी, पांढराबोडी, धुसाळा, कांद्री, रामटेक कडे जाणाºया येणाºया नागरिक, प्रवाशांची दुचाकी, चारचाकी वाहन धारकांची मोठी वर्दळ असते. मात्र सातोना ते नेरी रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्या वरील डांबर उखडून रस्त्यावर खड्डे पडल्याने वाटसरू, सायकल स्वार आणि दुचाकी व चारचाकी वाहनधारक प्रवाशी नागरिकांना प्रवास करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून यामुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादा अपघात झाल्यावर सदर रस्त्याचे डांबरीकरण करणार काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून या रस्त्याकडे सबंधित विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सातोना परिसरातील सुजान नागरिकांनी खंत, नाराजी व्यक्त केली असून त्यांच्या मध्ये तीव्र असंतोष पसरला आहे व भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम करणे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची नैतिक जबाबदारी असतांना सबंधित विभागाचे सदर रस्त्याकडे हेतू पूरस्पर अक्षम्य दुर्लक्ष होत असून सबंधित विभाग सुस्त व नागरिक प्रवाशी त्रस्त अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. सातोना ते नेरी रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याकडे दुर्लक्षकरण्याचे कारण काय? सदर रस्त्याच्या नादुरुस्ती मुळे एखादा अपघात होऊन जीवित व वित्तहानी झाल्यास यास जबाबदार कोण राहणार? या रस्त्याचे विहित कालावधीच्या आत डांबरीकरण करणार किंवा कसे? यास जबाबदार कोण? आदी प्रश्न या परीसरातील नागरिक व प्रवाशांनी उपस्थित केले आहेत. याप्रकरणी शासन प्रशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा प्रत्यक्ष मोका पाहणी सह सर्वेक्षण करून सातोना ते नेरी रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करून नागरिक, प्रवाशांना तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *