तुमसर शहरात शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरामध्ये शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी तालुक्यामध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. तुमसर शहरातील हनुमान नगर या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व शाखा फलक तथा भगव्या ध्वजाचे पूजन शिवसेना पदाधिकाºयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम यांनी शिवसेनेच्या इतिहासाची पुन्हा एकदा आठवण करून दिली. यापुढेही संकटकाळात सर्व शिवसैनिकांनी असेच एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच कार्यकर्त्यांना यापुढील काळात अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले.

तसेच तुमसर शहरातील सर्व शाखांमध्ये पक्ष संघटना अधिक जोमाने मजबूत करून बळकटीकण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शिवसेना शाखा प्रमुख पुष्पक त्रिभुवनकर यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित करून जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या. यावेळी उपशहर प्रमुख किशोर यादव, भूषण बूधे, शेखर जांगळे, शाखा प्रमुख निखिल कटारे, जितेश सानेकर, बुध प्रमुख दीपक मलेवार, तालुका वेल्फेअर प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष लिलाधर वाडीभस्मे, शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष पाठक, स्वप्निल बडवाईक, आदित्य गभने, पराग ईखार, तुषार लांजेवार, धम्मदिप सूर्यवंशी, श्रेयस गभने, आवेद शेख, ईशान शेंद्रे, सुखराम बडवाईक, विजेंद्र महाकाळकर, विकास बाराई, बबन चव्हाण यासह शिवसेनेचे विविध शाखेचे पदाधिकारी व शिवसैनिक वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास हजर होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *