पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : नाकडोंगरी वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या जंगलात गुरेकरून घटनेची माहिती दिली वनविभाग चमू घटना स्थळी पोहचवून जखमी दिलीप ला भंडारा येथेउपचारासाठी पाठविलेआहे.सध्या शेतामध्ये धानाची पीक लावल्याने शेतकरी रात्री बे रात्री शेतात जात असतात. पण आज झालेल्या घटनेमुळे कुठेतरी शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे.काही महिन्यापासून तुमसर व मोहाडी या दोन तालुक्यांमध्ये वाघाच्या हालचाली जास्त होत असल्याने यामागे काय कारण आहे ? आणि हे वाघ कुठून आले ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. चरायला घेवून गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना आज दिनांक २७ मार्च ला दुपारी २ वाजता सुमारास आसलपाणी जंगलात घडली.

दिलीप चव्हाण वय ५२ वर्षे रा. आसलपाणी असे जखमी चे नाव असून जखमी केल्यानंतर वाघाने पळ काढला. सध्या या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वृत्त असे की मोहाडी तालुक्यानंतर आता तुमसर तालुक्यामध्ये वाघाने धुमाकूळ मांडलेला आहे. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या आसलपाणी गावातील जंगलामध्ये नेहमीप्रमाणे गुराखी दिलीप चव्हाण हा गाई घेऊन गेला असता अचानक दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने पाठीमागून हल्ला करून दिलीप ला जखमी केले. दिलीप ने काठी दाखविल्याने वाघाने पळ काढला. या घटनेची माहिती गावामध्ये पसरताच गावकºयांनी नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज मोहिते यांना संपर्क

गुराखाना जंगलात जाण्यास मनाई !

नाकडोंगरी वन परीक्षेत्रा अंतर्गत जंगल परिसरात पट्टेदार वाघांचा वावर असल्यामुळे वन विभागातर्फे वारंवार गुराख्यांना व जंगलात काम करणाºया लोकांना याबाबद सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले परिणामी अशा घटनांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती मनोज मोहिते नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *