मोदी-अदानी यांच्या महाघोटाळया विरोधात कॉंग्रेसची पर्दाफाश रॅली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मोदी अदानी यांच्या महाघोटाळा विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज दिनांक २७ मार्च २०२३ ला ” पदार्फाश रैली ” काढण्यात आली. यावेळी माजी मंत्री बंडू सावरबांधे, कॉंगे्रस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई , कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष जयश्रीताई बोरकर, भंडारा जिल्हा काँगे्रस प्रभारी नंदा पराते , म प्र. काँग्रेस महासचिव जिया पटेल ,जि.प. अध्यक्ष गंगाधर जिभाकटे, सभापती रमेश पारधी,मदन रामटेके, स्वती वाघाये यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.

यावेळी हँडनबर्ग संस्थेच्या अहवालानुसार अडानी कंपनीच्या गैरव्यवहाराचे संसदिय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी व जनतेच्या पैशाला संरक्षण मिळावे, महागाई. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर चे दर कमी करण्यात यावे,ओबीसींची जातीय जनगनणा करावी. राज्य सरकारने गरज नसतानी भारतीयमन कमी केले होते पण आता धान रोवनी सुरू असतानी शेतकन्यांना दररोज ५ ते ६ तास विद्युत मिळत आहे त्यामुळे जिल्यातील भारतीयमन कमी करून कृषी पंपांना १२ तार विद्युत द्यावी, रेतीघाट लिलाव न झाल्यामुळे अनेक खासगी व शासकीय बांधकामे रखडलेले आहेत. चोरटया रेतीचे दर गगनाला भिडलेले आहेत, तरी जिल्हयातील रेतीघाटांचे लिलाव करून किंवा शासकिय दराने बांधकामाकरिता रेती उपलब्ध करून द्यावी, महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेचा अर्थसंकल्प तरतुद फार कमी केली असुन जाचक अटी घालून काम न करता ग्रामिण विकास उमटविण्याचा शडयंत्र सुरू आहे. तरी महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेचे जाचक अटी कमी करून कामे सुरू करण्यात यावी.उमरेड-पवनी-कन्हांडलाव्याघ्र प्रकल्प.

गोसेखुर्द प्रकल्प, बावनथडी प्रकल्प, त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबीत समस्या दूर करण्यात याव्या. एखडलेला भेल प्रकल्प जिल्हयात रोजगाराच्या संधी प्राप्त होण्याकरीता सुरू करण्यात याव्या. निलज – पवनी-कारधा महामार्गाचे काम ५ वषार्पासुन संघ गतिने सुरू असुन प्रवाशांना प्रवास करताना खुप त्रास होतो, अनेकांना अपघातांमध्ये अपंगत्व व मरण पत्करावे लागले आहे, तरी या महामार्गाचे काम तातळीने पुर्ण करण्यात यावे आदि मागण्यांचा समावेश आहे. यावेळी मधुकर लिचडे, प्रमोद तितिरमारे, विकास राऊत, प्रेमसागर गणवीर, प्यारेलाल वाघमारे, राजू निर्वान, उत्तम भांडारकर, शंकर राऊत, राजेश हटवार, उमेश कटरे, शंकर तेलमासरे, धनराज साठवणे, राजू पालिवाल, धनंजय तिरपुडे, राजकपूर राऊत, प्रशांत देशकर, कैलास भगत, राकेश कोडापे, मंजुषा चव्हाण, सारिका नागदेवे, स्वती हेडाऊ, मनीषा निंबार्ते, योगश गायधने, शंकर राऊत, प्रेम वनवे, अनिता भुरे, रिजवान काझी, सोनू कोटवानी, व जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नेते, व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *