‘डिजीटल अगणवाडी’ च बाधकाम कणासाठी?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील प्रभाग १४ मधील बंद असलेल्या बजाज प्राथमिक शाळा परिसरात लाखो रुपये खर्चुन नव्याने बांधण्यात आलेल्या ‘डिजीटल अंगणवाडी’ केंद्राच्या इमारतीचा उपयोग चिमुकल्यांसाठी न होता बांधकामाचे साहित्य ठेवण्या करीता केला जात आहे.त्यामुळे अंगणवाडी चे बांधकाम नेमके कशासाठी ? असा प्रश्न परिसरातील नागरीक विचारत आहेत. आजचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे.त्यामुळे अंगणवाडीतील लहान मुलांनासुध्दा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बोलक्या स्वरूपात व्हिडीओद्वारे शिक्षण घेता यावे याकरीता भंडारा नगर परिषदेतर्फे वैशिष्टयपुर्ण ठोक तरतुद योजने अंतर्गत बजाज प्राथमिक शाळा परिसरात लहान मुलांकरीता ‘डिजीटल अंगणवाडी’ केंद्राचे बांधकाम करण्यात आले. ८० लाख रुपये एवढा खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या या ‘डिजीटल अंगणवाडी’ केंद्राचे रितसर उद्घाटन भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसा दिनी २६ जुन रोजी करण्यात आले.मात्र ‘डिजीटल अंगणवाडी’ केंद्राचे उद्घाटन होवुन पाच-सहा महिन्याचा कालावधी लोटुनसुध्दा हे डिजीटल अंगणवाडी केंद्र लहान मुलांच्या किलबिलाटा पासुन अद्यापही वंचित आहे.

पाचसहा महिने लोटुनसुध्दा या ठिकाणी अद्यापही लहान मुलांची शिकवणी सुरूच झालेली नाही. त्यामुळे या अंगणवाडी केंद्राची खरच आवश्यकता होती का? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. ‘डिजीटल अंगणवाडी’ केंद्राचा उपयोग लहान मुलांसाठी होत नसला तरी बांधकाम व्यवसायीक मात्र या अंगणवाडीचा पुरेपुर उपयोग करतांना दिसुन येत आहेत.अंगणवाडी केंद्रात सध्या बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे.त्यामुळे अंगणवाडी केंद्राचे नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. अंगणवाडी केद्रातील मुलांच्या शिकवणी वर्गामध्ये लोखंडी सळाखी व इतर साहित्य ठेवण्यात आले असुन शौचालयामध्ये सिमेंटच्या बॅगा ठेवण्यात आल्या आहेत. कदाचीत या बांधकाम कंत्राटदाराला त्याचे बांधकामाचे साहित्य ठेवण्यास कुठलीही अडचण भासू नये याकरीता हे अंगणवाडी केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नसावे.यामधुन नगर परिषद प्रशासन हे सर्वसामान्य जनतेसाठी नसुन कंत्राटदारासाठी काम करीत असल्याचे उघडपणे दिसुन येते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.