तिरोडा आगाराच्या एसटी बसला भीषण अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : गोरेगाव वरुन इंदोरा मार्गने तिरोडा कडे येणारे तिरोडा आगाराची बस वीजेचे खांबाला धडकली सुदैवाने बसला विजेचे तारांचा स्पर्ष न झाल्याने मोठी दुर्घटना टळली असुन अपघातात चालक वाहकासह तीन जण गंभीर व अकरा किरकोळ जखमी झाले आहेत. आज दिनांक ३ डिसेंबर रोजी तिरोडा आगाराची एम एच ४० एन ९५०७ क्रमांकाची बस गोरेगाव येथून इंदोरा मार्गे तिरोडाकडे येण्यास निघाली असता सकाळी १०.३० दरम्यान रुस्तमपुर वळणाजवळ ही बस बेकाबू होऊन रस्त्याचे उजवे बाजूला जाऊन जिवंत तारांचे विद्युत पोलला धडकल्याने सुदैवाने विद्युत तारा तुटून बसवर न पडल्याने बसमधील अकरा प्रवासी व चालक वाहकांना विजेचा धक्का लागला नसल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी या अपघातात बस चालक मनोज जिभकाटे,वाहक अनील सारवे, प्रवासी काशीराम देवरू उके ७३ वर्ष राहणार गराडा हे गंभीर जखमी झाल्याने तसेच गंगा. भागीरथी. सुलोचना रंहांगडाले राहणार ईदोरा पन्नास वर्ष त्यांची मुलगी कुमारी भाग्यश्री बावीस वर्ष ,दिलीप खुलसिंगे बत्तीस वर्ष, कुमारी अक्षरा लांजेवार अकरा वर्ष राहणार कुºहाडी ,कुमारी अनन्या लांजेवार दहा वर्ष कुरºहाडी, सौ.डिलेक्ष्वरी बोपचे ३४ वर्ष तिरोडा, जयदेव लांजेवार ३८ वर्षे कुराडी, आनंदराव शिवनकर ५५ वर्ष रा. पूरगाव, अंकित खोब्रागडे २२ वर्षे जिंदाटोला, जखमी झाले असून यापैकी तिघांना चालक,वाहक व काशीराम उके यांचेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचार करता गोंदियाला रवाना करण्यात आले असून इतर किरकोळ जखमींवर उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचार करून सुट्टी देण्यात आली असून अभघाताची माहिती मिळताच तिरोडा आगार व्यवस्थापक के. जे .भोगे बस स्थानक प्रमुख रचना मस्करे आपले कर्मचाºयांसह रिलीफ बस घेऊन घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णवाहिका व बसणे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे रवाना केले तर वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ केतनकुमार बोदेले यांना या अपघाताची माहिती होताच त्यांनी त्वरित विज उप केंद्रावर माहिती देऊन विज पुरवठा बंद केला या भीषण अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची शक्यता असून तिरोडा आगारातील अनेक बसेस अत्यंत जुन्या झाल्याने अनेकदा रस्त्यातच बिघाड होऊन प्रवासी व चालक वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या अपघातातून धडा घेऊन राज्य परिवहन महामंडळाने सुस्थितीत असलेल्या बसेसच रस्त्यावर पाठवाव्या अशी आशा अपघात स्थळी उपस्थित जनसमुदायाने वर्तवली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *