तीन राज्यांमध्ये भाजप तर एका राज्यात कॉंग्रेस

वृत्तसंस्था नवी दिल्ली: देशातील चार राज्यांचे निकाल हाती आलेले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण आणि छत्तीसगड पैकी केवळ तेलंगणात काँग्रेसने सत्तेला गवसणी घातली आहे. बाकी तीन राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली. सायंकाळी सात वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार छत्तीसगडच्या ९० जागांपैकी २१ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तर ३३ उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे १५ उमेदवार विजयी झाले असून २१ उमेदवार आघाडीवर आहेत.

मध्य प्रदेशमध्ये २३० जागांपैकी भाजपने ९४ जागांवर विजय मिळवला आहे. तर ६९ जागांवरील उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे २७ उमेदवार विजयी झाले असून ३९ जागांवरील उमेदवार आघाडीवर आहेत. भारत आदिवासी पार्टीचा एक उमेदवार विजयी झालेला आहे. राजस्थानध्ये १९९विधानसभेच्या जागा आहेत. भाजपने १०७ जागांवर विजय मिळवला असून ८ जागा आघाडीवर आहेत. तर काँग्रेसने ६० जागा जिंकल्या आहेत. तर ९ उमेदवार आघाडीवर आहेत. भारत आदिवासी पार्टीचे ३ उमेदवार विजयी झालेले आहेत, बीएसपी २ आणि अपक्ष ५ उमेदवार विजयी झालेले आहेत. तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागा आहेत. त्यापैकी ४८ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला असून १६ उमेदवार आघाडीवर आहेत. केसीआर यांच्या बीआरएसने २६ जागा जिंकल्या आहेत आणि १३ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. येथे भाजपने ७ जागाजिंकल्या असून १ उमेदवार आघाडीवर आहे. एमआयएमने २ जागा जिंकल्या असून ५ उमेदवार आघाडीवर आहेत. सीपीआयने एका जागेवर विजय मिळवला आहे.

पंतप्रधानांवरील विश्वासाचे प्रतीक म्हणजे तीन राज्यातील विजय – खासदार सुनिल मेंढे

देशाला विश्वगुरू करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन सातत्याने देशहितासाठी प्रयत्न करत असलेल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा देशातील नागरिकांनी दाखविलेला विश्वास म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले घवघवीत यश आहे. पंतप्रधान मोदीजी यांचा विकासाचा मंत्र देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेने स्वीकारला आहे. कल्याणकारी योजना, आरोग्याची काळजी आणि लोकांच्या मनातील विषयांना हात घालून सुरू असलेल्या वाटचालीचा हा परिपाक असल्याची प्रतिक्रिया खासदार सुनील मेंढे यांनी तीन राज्यातील विजयाच्या निकालानंतर दिली. विजयात पक्ष संघटनेच्या प्रत्येक शेवटच्या टोकावरील कार्यकत्यार्चे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून असे समर्पित कार्यकर्ते या विजयाचे वाटेकरी असून सगळ्यांची अभिनंदन करतो असेही खासदार सुनिल मेंढे म्हणाले.

 

तेलंगणाच्या पराभवाने खचुन न जाता अधीक जोमाने काम करु – चरण वाघमारे

नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल घोषित झाल्याने तेलंगणा राज्यात सत्ता परिवर्तन होऊन भारत राष्ट्र समितीचा पराभव झाल्याने या पराभवास खचुन न जाता महाराष्ट्रात अधिक जोमाने काम करुन आमचे नेते के. चंद्रशेखर राव यांचे पाठीशी सक्षमपणे उभे राहू असे वक्तव्य भारत राष्ट्र समिती पूर्व विदर्भ समन्वयक माजी आमदार चरण वाघमारे यांनी केले आहे. तेलंगणा राज्य संयुक्त आंध्रप्रदेशात असतांना देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या राज्यात होत असतांना तेलंगणा वेगळा प्रदेश होण्यासाठी आमचे नेते के चंद्रशेखर राव यांनी आंदोलन उभारुन २०१४ ला वेगळा तेलंगणा राज्य निर्मिती करून घेत राज्यात बी.आर.एस. ची सरकार स्थापन करुन शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची दखल घेत अनेक योजना राबविण्यात कोणत्याही प्रकारची कसर सोडली नाही. असे असतांना तेलंगणा राज्य निर्मिती पासुन सतत दहा वर्षात राज्य सरकारचे नेतृत्व करीत असतांना कदाचित आंतरीक मतभेद निर्माण झाल्याने असे निकाल येण्याची शक्यता नाकारता येत नाही.तेलंगणा राष्ट्र समितीचे भारत राष्ट्र समिती म्हणून राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त करून राष्ट्रीय पक्षाचे नावानुसार राष्ट्रीय चिन्हावर पहिलीच निवडणूक असुन अपेक्षित परिणाम मिळाले नसले तरी आमचे नेते मा के चंद्रशेखर राव यांनी जनमताचा आदर करुन पराभवाचा स्वीकार करत येणाºया सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे तेलंगणा राज्यातील निवडणुकीचे परिणाम लक्षात घेता आणि मा के सी आर साहेबांच्या ध्येयवादी धोरणाचा विचार करुन या अपयशाला न घाबरता महाराष्ट्र राज्यातील स्थानिक समस्या व प्रश्नांवर लक्ष केंद्रित करुन आगामी निवडणुका अधिक जोमाने लढण्याचा निर्धार करत के चंद्रशेखर राव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु अशी माहिती पुर्व विदर्भ समन्वयक माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.