संगणक परिचालकाचा आमदाराचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायतला कार्यरत संगणक परीचालकाना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार आकृतीबंधात समाविष्ट करून कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागणीसाठी मागील १२ वर्षापासून संगणक परीचालकाचे नागपुर, मुंबई येथे अनेक आदोलन झाले. मात्र अजुनही निर्णय लागलेला नसल्या कारनाने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेकडून राज्यभरात ८ नोव्हेंबर २०२३ पासून बेमुदत कामबंद आदोलन सुरू आहे. सोबतच सरकार, प्रशासनावर दबाव यावा यासाठी म्हणून २० नोव्हेंबर २०२३ ला पंचायत समिती कार्यालयासमोर, २८ नोव्हेंबर ला जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र त्या आदोलनाचीही दखल घेण्यात आलेली नाही त्याकारनाने आज विधानसभा सदस्याचे कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

भंडारा जिल्हातही भंडारा, साकोली, तुमसर विधानसभा क्षेत्रात आमदार साहेबाचे निवासस्थानासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. तुमसर येथील आमदार राजु कारेमोरे यानी त्याचे कार्यालयासमोर सुरू असलेल्या संगणक परिचालकाचे आदोलनास भेट देऊन मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली आणि येत्या हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यांबाबत प्रश्न उपस्थित करून तो सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याचेशी फोनवर चर्चा करून जिल्हा स्तरावरील प्रश्न तात्काळ सोडविण्यात याव्या अशी सुचना केली. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्षदिगांबर कुंडलिक वंजारी याचे नेतृत्वात जिल्ह्यातील विधानसभा सदस्याचे कार्यालयासमोर सुरू असलेल्या तुमसर येथील आदोलनाचे यशस्वीतेसाठी तुमसर तालुकाध्यक्ष खेमेंद्र राणे, लिला काहालकर, लक्ष्मीकांत कोहळे, गिरीजा रहांगडाले व तालुक्यातील सर्व संगणक परीचालकानी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *