मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ या राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी राज्यातील ८ तालुका पत्रकार संघाची निवड करण्यात आली. विदर्भातून नागपूर विभागातुन मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाची निवड करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाची निवड करण्यात आली आहे. शुक्रवार दि.७ एप्रिल २०२३ ला अहमदनगर जिल्हातील कर्जत येथे पुरस्काराचा वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. यावेळी दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे प्रमुख उपस्थितीत तर आमदार रोहित पवार हे मेळाव्याचे स्वागताध्यक्ष असतील. तत्पूर्वी दि. ६ जानेवारी २०२३ ला पत्रकारदिनी भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाला स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनेदरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाºया तालुका पत्रकार संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने गौरविण्यात येते. पुरस्कार वितरण सोहळे प्रामुख्याने ग्रामीण भागातच घेतले जातात. यावर्षी हा सोहळा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे.
या मेळाव्यासाठी राज्यभरातून किमान ८०० प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. याबाबतचे नियोजन कर्जत आणि जामखेड येथील संयोजन समिती संयुक्तरित्या करीत आहेत. मेळाव्यास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वकांत भुजाडे वरठी,सचिव चंद्रशेखर साठवणे मोहाडी, उपाध्यक्ष युवराज गोमासे पालोरा, तथागत मेश्राम वरठी, कोषाध्यक्ष संजय मते आंधळगाव, सदस्य भोजराम तिजारे पालोरा, सुधीर गोमासे खरबी, यादोराव मुंगमोडे, भगवान पवनकर, भुपेंद्र पवनकर, आशा वैद्य जांभोरा, मुनेश्वर मलेवार देव्हाडा, राजू तुमसरे करडी, विलास बन्सोड उसरला, प्रितम गोळंगे जांब, नितीन लिल्हारे सालई खुर्द व यशवंत थोटे मोहाडी यांनी आनंद व आभार व्यक्त केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *