आयुध निर्माणी भंडारा येथे महिलांच्या टेनिस बॉल रात्रकालीन सामन्यांची सुरूवात

भंडारा पत्रिका/वार्ताहर जवाहरनगर : आयुध निर्माणी भंडारा येथील प्रोफेक्स क्रीडांगणावर महिलांच्या रात्र कालीन टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन ३ एप्रिल पासून करण्यात आले. या सामन्याचे उद्घाटन निर्माणीचे महाप्रबंधक पी. के. मेश्राम तसेच त्यांच्या मातोश्री व दीपशिखा महिला कल्याण समितीच्या अध्यक्ष श्रीमती ललित कुमार मॅडम व त्याचप्रमाणे अप्पर महाप्रबंधक ललित कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. हे सामने १५ एप्रिल पर्यंत चालणार आहे. आज उद्घाटकीय सामना रॉयल इलेव्हन व स्टनिंग क्वीन्स या दोन टीम मध्ये खेळला गेला. प्रथम बॅटिंग करताना स्टनिंग क्वीन या संघाने सहा षटकार ७८ धावा बनवल्या.
त्यामध्ये रेवती पिल्लारे हिने ५५ रनांचे योगदान दिले. पाठलाग करतानारॉयल इलेव्हन संघ सहा षटकार फक्त ३५ धावा बनवू शकला. या सामन्यांचे आयोजन स्पोर्ट क्लब आयुध निर्माणी भंडारा द्वारा करण्यात आलेले आहे. या टूनार्मेंट मध्ये महिलांच्या आठ संघाने सहभाग घेतला आहे. सर्व सामने लिग पद्धतीने होऊन सेमी फायनल मध्ये चार टीम जातील. या प्रतियोगिता मुळे जवाहरनगर परिसरात परिसरातील महिलांमध्ये खेळभावना संचारली असून सामने बघण्याकरता प्रोफेक्स क्रीडांगणावर जवाहरनगर परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती. महिलांची क्रिकेट स्पर्धेचे सफल आयोजना करता जस्मित सिंग, सुनील नागदेवे, योगेश झंझाड, श्रीकांत इंगळे, विजय मडामे, राहील खान, आर. पी. रॉय, विकास वनवे, दीपक शिंगाडे, अरविंद नेवारे हे परिश्रम घेत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *