जिल्ह्यातील समस्याच तात्काळ निराकरण करा – मोहन पचभाइ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा हा मुख्यत: शेती व्यवसायावर अवलबून असलेला जिल्हा आहे. जिल्हातील शेती व्यवसायावर यावर्षी दोन्ही हंगामात अस्मानी व सुल्तानी संकट आलेले आहे. खरीप हंगामात निसगार्मुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर रब्बी हंगामात महावितरणाने चालु केलेल्या भार नियमनामुळे शेत पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. भार नियमनामुळे हाता-तोंडासी आलेले पिक शेतकºयांच्या पदरात पडते की नाही असी चिंता शेतकºयांना पडली आहे. हिवाळी अधिवेशनात मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी पंपाना १२ तास विज देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु जिल्ह्यात शेतकºयांच्या नसिबी ८ तास देखील विज मिळू शकत नाही ही शोकांतीका आहे. विद्युत भार नियमनामुळे अनेक शेतकरी चिंताग्रस्त झाले असून सरकारने वेळीच दखल घेण्याची गरज असून कृषी पंपाना १२ तास विद्युत देण्यात यावी.या आशयाचे निवेदन जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात काँग्रेस शिष्टमंडळ यांच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. त्यात भंडारा जिल्ह्यात मागील दिवसात गारपिठीने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करुन मदत जाहिर करावी, नियमित कर्ज परतफेडकरणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर ५०,०००/- रुपयांची मदत द्यावी. हिवाळी अधिवेशनात जाहिर झालेल्या धानाचे अनुदान (बोनस) शेतकºयांना देण्यात यावे.

गोसे खुर्द धरणातील डाव्या कालव्याचे पाणी उन्हाळी धानपिकांना सुरु करावे. जिल्ह्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे करिता रस्ते तात्काळ नुतनीकरण करण्यात यावे. जिल्ह्यातील भुमिगत गटार योजनेच्या नावाखाली फोडलेल्या रस्त्याचे तात्काळ नुतनिकरण करण्यात यावे. जिति मोठ्या प्रमाणात शासकिय पदे रिक्त आहेत ते पदे भरण्यात यावे. जिल्ह्यात तरुणांसाठी रोजगाराच्यादृष्टीने उद्योग केंद्र सुरु करावे. या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या.अशा अनेक मागण्या होत्या. यावेळी प्रेमसागर गणवीर, जयश्री ताई बोरकर, धनंजय तिरपुडे, राजू भाऊ निर्वान, पृथ्वी तांडेकर, रिजवान काझी, मंगेश हुमणे, गजानन बादशाह, भूपेंद्र साठवणे, सुनील शिवरकर, शाहिद अली, पवन वंजारी, प्रकाश देशमुख, विनीत देशपांडे, स्वाती हेडाऊ,अनिता भुरे,धर्मेंद्र गणवीर, शेख नवाब, नाहिद परवेज, महमूद खान, जगदीश उके, परवेश झलके, मुलचुंद् ईश्वरकर, किशोर राऊत, नरेंद्र साकुरे, राजू जागडे, किशोर राऊत व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *