साहेब, आमच्या प्रश्नाविषयी बोला…

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापत आहे. नेहमीप्रमाणे आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र, ही निवडणूक जरी बाजार समितीची असली तरी प्रचार सभेत राज्य आणि देश पातळीवरील मुद्यांवर भाषणबाजी करण्यात येत आहे. मात्र शेतकºयांना बाजार समितीत मिळवणाºया सुविधा, शेतकºयांच्या अडचणी, या विषयावर कोणी बोलण्यास तयार नाहीत. वैयक्तीक टिका टिपण्णी करण्यात येत असल्यामुळ साहेब, आमच्या प्रश्नाविषयी बोला, अशा भावना शेतकºयांतून व्यक्त केल्या जात आहेत. जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून ज्यांना जमेल तशी आखाडी व युती करण्यात आली आहे. भंडारा कृषी बाजार समितीच्या जागा काँग्रेस स्वबळावर लढत आहेत तर व भाजप, राष्टÑवादी व शिवसेना (शिंदे गट) एकत्र लढा देत आहेत.

पवनी, लाखांदूर व लाखनी बाजार समितीमध्ये सुद्धा काँग्रेसचा एकला चलो रे चा अजेंडा असून महाविकास आघाडीची बिघाडी झाली आहे. असे सोयीचे राजकारण जिल्ह्यात चालू आहे. बाजार समितीच्या या निवडणूकीत स्थानिक पातळीवरील नेत्यांनी जमेल तशी युती व आघाडी केली असून फक्त आपली सोय पाहिली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे माया नसल्याने पक्षानेही त्यांच्या वरची माया पातळ केल्याची चर्चा आता रंग भरू लागली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना शेतमाल विक्रीवर नियंत्रण, शेतकºयांना सुविधा देणे, खरेदी विक्रीचे व्यवहार कायदेशीर होणे, व्यापाºयांवर नियंत्रण, नोंदणी आदी महत्त्वाच्या बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी झाली. पण मुळ उद्देश बाजूला गेला असून राजकारणाचे एक केंद्र झाले आहे.

या समितीवर आपली पकड रहावी, यासाठी निवडणुकीत लाखोंचा खर्च केला जात आहे तो कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही निवडणूक जरी बाजार समितीची असली तरी प्रचार केला जात आहे तो राज्य व देशपातळीवरील मुद्यांवर. वास्तविक पाहता शेती, शेतकरी, बाजार समितीचा कारभार, शेतकºयांना मिळणाºया विविध, शेतमाल खरेदी विक्रीच्या व्यवहारांची पारदर्शकता, शेतमाल विक्री झाल्यावर उशीरा मिळणारा पैसा, शेतकºयांना विश्रांतीसाठी चांगली व्यवस्था, अनागोंदी कारभार आदी विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. पण प्रचार केला जात आहे तो राज्य व देशपातळीवरील मुद्यांवर. शिवाय साम, दाम, दंड आणि भेद नितीचा वापर केला जातो, हे सांगणे नकोच.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.