महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तीन बेपत्ता मुलांचे मृतदेह आढळून आले. त्यांची चौकशी करुन त्यांना योग्य न्याय देण्यात यावे. याकरीता महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाध्यक्ष श्रीमती सरिताताई मदनकर यांच्या नेतृत्वात दिनांक १९ जून २०२३ रोज सोमवारला जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा यांना निवेदन देण्यात आले. नागपूर टेका नाका परीसरात तीन चिमुकले बेपत्ता झाल्यानंतर त्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. फारुखनगरच्या मोहम्मदिया मशिदीजवळ राहणारी आलिया फिरोज खान, आफरीन इर्शाद खान, लौसीफ फिरोज खान, ही तीन मुले शनिवारी दुपारी बेपत्ता झालीहोती. परीसरात उभ्या असलेल्या कारमध्ये त्यांचे मृतदेह आढळून आले.

कारमध्ये खेळता खेळता ते अडकले असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. त्यांचा अपघात किंवा हत्या आहे, याबाबत योग्य ती चौकशी करण्यात यावी व चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यात यावी हि मागणी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कडून करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितामध्ये शहर अध्यक्ष सौ.मंजुषा बुरडे, पं.स. सदस्य सौ. किर्ती गणविर, घनंवता बोरकर, कु. निशा राऊत, ग्रा.पं.सदस्य सौ. संजोक्ता सोनकुसरे, ग्रा. पं. सदस्य सौ. संध्या बोदेले, लता मेश्राम, सौ. वर्षा आंबाडारे, सौ. अनिता महाजन, सौ. विद्या साखरे, सौ. संगीता चव्हाण व फार मोठया संख्येने महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *