लाच मागणाºया दोघाना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मोजणी केलेल्या शेतीची ‘क’ प्रत देण्याच्या मोबदल्यात २२ हजार रूपयाची लाच मागणाºया दोघांना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी रंगेहात अटक केली.अरविंद अंबादास सूर्यवंशी वय ५३ वर्ष, पद – शिरस्तेदार, भूमी अभिलेख कार्यालय पवनी , जि. भंडारा व खाजगी ईसम पे्रमकुमार अशोक डुंभरे वय २६ वर्षे रा.सोमवारी वार्ड पवनी अशी लाच मागणाºयांची नावे आहेत. तक्रारदार हे शेतकरी असुन त्यांची ग्राम वडेगाव ता. पवनी येथे वडिलोपार्जित ३ एकर शेती आहे. सदर शेती च्या मोजणी करिता त्यांनी दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी भूमी अभिलेख कार्यालय पवनी येथे अर्ज केला होता. त्यानुसार मार्च २०२३ मध्ये भूमी अभिलेख कार्यालय पवनीतर्फे त्यांच्या शेताची मोजणी करण्यात आली. सदर शेतीची मोजणी झाल्यानंतर मोजणी बाबतची ह्यक’ प्रत मिळण्यासाठी तक्रारदारांनी भूमी अभिलेख कार्यालय पवनी येथे पाठपुरावा केला. मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांना ‘क’ प्रत देण्यात आली नाही. म्हणून त्यांनी त्याबाबत भूमी अभिलेख कार्यालय पवनी येथे लेखी अर्ज सादर केला. दि.१० जानेवारी २४ रोजी तक्रारदार यांनी भूमी अभिलेख कार्यालय पवनी येथील कर्मचारी आरोपी अरविंद सूर्यवंशी यांना भेटून मोजणी केलेल्या शेतीची ‘क ’ प्रत मागीतले असता अरविंद सुर्यवंशी यांनी त्यांना ‘क’ प्रत देण्यासाठी २२ हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने याची भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली . तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सापळा कारवाई केली असता दि.२९ जाने. २४ रोजी आरोपी अरविंद अंबादास सूर्यवंशी यांनी खाजगी इसम प्रेमकुमार डुंभरे यांचे मार्फत तक्रारदाराकडून २२ हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींविरोधात पवनी पोलीस स्टेशन येथ गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई नागपूर ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर ,नागपूर ला.प्र.वि. नागपूर अप्पर पोलीस अधिक्षक सचिन कदम नागपूर ला.प्र. वि. नागपूर अप्पर पोलीस अधिक्षकसंजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात ला.प्र.वि.भंडाराचे पो. उप. अधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार व पो नि सोनटक्के, पो हवा मिथुन चांदेवार, पा.े ना.अतुल मेश्राम,पो. शि.विवेक रणदिवे, चालक पो. शि. राहुल राऊत ,पोलीस निरीक्षक डहारे ,पो. ना. अंकुश गाढवे, पो. शि. चेतन पोटे, पो. शि. राजकुमार लेंडे, पो. हवा. गोस्वामी,पो. ना.लाखडे,पो. ना. शिलपेंद्र मेश्राम, म. पो. शि.अभिलाषा गजभिये यांनी केली

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *