महा संस्कृतीत खाद्य पदार्थांची रेलचेल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गेल्या २६ जानेवारी पासून सुरू असलेल्या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवात खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल लागले आहेत. खवय्यांची पावले आपसूक खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर वळत आहेत. मोठ्या प्रमाणावर आप्पे, इडली, फिश फ्राय व नवीन तांदुळापासून बनवलेले आक्षे, मसाले भात,मांसाहारी विविध पाककृती, लहान बालगोपालांसाठी भेल, पाणीपुरी मसाला, पापड यासह संपूर्ण जेवणाची व्यवस्था केली आहे. आर्थिक विकास महामंडळ व उमेदच्या बचत गटांसोबतच जीवनोनत्ती अभियानातील बचत गटांच्या महिला अगदी गरम गरम झुणका भाकरपासून तर पकोड्यांपर्यंतच्या पाककृती महासंस्कृतीला भेट देणाºया व खवय्यांच्या जिभेला तृप्त करत आहेत. महा संस्कृती महोत्सवात आज स्थानिक लोक कलावंतांची कला सादरीकरण झाले.

दुसरीकडे खाद्यपदार्थांच्या बरीच गर्दी झाली. काल रात्री जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व अन्य विभाग प्रमुख आणि देखील बचत गटांच्या स्टॉलवरील पदार्थांचा आस्वाद घेतला. पुढील दोन दिवस महा संस्कृती उत्सवात भंडारावासी यांना खाद्यपदार्थांची चव चाखता येईल. गेल्या दोन दिवसापासून खाद्य स्टॉलला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. २० हजार रुपयांची विक्री झाली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *