नेरला येथे मअंनिस शाखेची स्थापना

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नेरला या ठिकाणी नुकतीच शाखा स्थापन करण्यात आली. अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या नेरला येथे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा बुवाबाजी संघर्ष विभाग राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर यांच्या उपस्थितीत स्थापन करण्यात आली. या शाखेचे अध्यक्ष अनमोल कावळे, उपाध्यक्ष बक्शी कारनेगे, उपाध्यक्ष विजय गजभिये, कार्याध्यक्ष हर्षवर्धन रामटेके, प्रधान सचिव दीपक दहिवले, बुवाबाजी संघर्ष विभाग अविनाश कोदाणे याची निवड करण्यात आली. उपस्थितांना जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदी समजून सांगण्यात आल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *