अंगणवाडी कर्मचाºयांचा बेमुदत संप सुरु

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अंगणवाडी कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा द्या व इतर प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करून संप मिटवा अशी मागणी आयटक चे भंडारा जिल्हा सचिव व अंगणवाडी युनियनचे कार्याध्यक्ष कॉ. हिवराज उके यांनी अंगणवाडी कर्मचाºयांंसमोर भाषण करताना केले. व त्यानंतर संपानिमित्त विविध मागण्यांचे सर्व संबंधित अधिकाºयांना निवेदन दिले. त्यात अंगणवाडी कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांच्या दर्जा, तत्पूर्वी किमान वेतन, मानधन वाढ, ग्रॅच्युईटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्री महिला बाल विकास यांच्या कक्षा दिनांक १२ जानेवारी २०२३ ला झालेल्या बैठकीत मान्य केल्यानुसार दरमहा पेन्शन, आजारपणाची रजा, मिनी अंगणवाडी सेविकांना मोठ्या अंगणवाडी सेविका प्रमाणे मानधन, अंगणवाडी केंद्राची भाडेवाढ, पोषण आहार रक्कम वाढ, चांगल्या दर्जाचा कार्यक्षम ३०० रुपये मोबाईल रिचार्ज, मराठीत पोषण ट्रेकर अ‍ॅप, सेवानिवृत्तीचा लाभ इत्यादीची अंमलबजावणी तसेच मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबांना केंद्र शासनाचे आदेशाप्रनुसार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ तात्काळ द्या, इत्यादी मागण्यासाठी आज सोमवार दि. ४ डिसेंबर २०२३ पासून आयटक एचएमएस अंगणवाडी कृती समितीच्या वतीने बेमुदत राज्यव्यापी संप सुरू करण्यात आला.

या संपा निमित्त४ डिसेंबर पासून सर्व अंगणवाडी कर्मचारी भंडारा जिल्हा परिषदेत समोर धरणे देऊन बसलेले आहेत. आणि मागण्यांची पूर्तता होईपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याचे कॉम्रेड हिवराज उके यांनी सांगितलेले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक चे राज्याध्यक्ष कॉ. दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष कॉ सविता लुटे, जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. हिवराज उके तसेच अंगणवाडी कर्मचारी सभेच्या किसना भानारकर या करीत आहेत. याप्रसंगी आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सविता लुटे, अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा किसनाबाई भानारकर तसेच आयटकच्या रीता लोखंडे, मंगला गजभिये, अलका बोरकर, गौतमी मंडपे इत्यादींनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आयटकच्या मंगला रंगारी, रेखा टेंभुर्णे, विजया काळे, छाया क्षीरसागर, कुंदा भदाडे, दीपा पडोळे, सुनंदा बडवाईक, वंदना पसीने, सुनंदा चौधरी, प्रमिला बागडे, वैशाली भोंडे तसेच अंगणवाडी कर्मचारी सभेच्या त्रिवेणी माकडे शोभा बोरकर कल्पना साठवणे पुष्पा हुमणे विभा भोगे श्याम कला सातव इत्यादींची उपस्थितीत होती. सुमारे दीड ते दोन हजार अंगणवाडी कर्मचारी आज धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत अशी माहिती देखील उके यांनी दिली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *