कॅफेत चाकू हल्ला; दोघे जखमी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : कॅफेमध्ये उर्मटपणे बोलण्याच्या कारणावरून तरुणांशी वाद होऊन वेटर ने चाकू हल्ला केला. यात एका तरुणांसह दुसरा कामगार जखमी झाला. सदर घटना आज २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास भंडारा शहरातील दी कॅफे मध्ये घडली. मारुफ अली अख्तर अली सय्यद (वय २१) रा. अन्सारी वॉर्ड भंडारा व आदेश बोंद्रे रा. सालेबर्डी अशी जखमिंची नावे आहेत. या प्रकरणी आरोपी असलम कुरैशी रा. बालाघाट (ह.मु.भंडारा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी स्वत: घटनास्थळी पोहचून माहिती जाणून घेतली व फरार आरोपीचा शोध घेत तत्काळ अटक करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकाºयांना दिले. अवघ्या काही तासात भंडारा पोलिसांनी फरार आरोपीला ताब्यात घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *