नागरिकांनी योग दिनाबरोबर नियमित योगा करावे – डॉ. वाहने

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : संपुर्ण जगभरात दि. २१ जुन २०२३ रोजी ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन हा ‘हर घर-आंगन योग’ या टॅगलाईन नुसार वसुधैव कुटुंबकम् करिता योग ( Yoga for Vasudhaiva Kutumbakam) या संकल्पनेवर साजरा केला जात आहे. तरी नागरिकांनी स्वत:च्या क्षमतेनुसार आंतरराष्ट्रीय योग दिनाबरोबर नियमित योग-प्रणायाम करावे असे प्रतिपादन खमारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सि. के. वाहने यांनी केले. ते जिल्हा परीषद आरोग्य विभागाअंतर्गत येणाºया आरोग्य वर्धिनी व प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य केंद्र खमारी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. मंजिरी खरकाटे, योग शिक्षक विलास केजरकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सि. के. वाहने व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. योग शास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थौल्य, थॉयराईड वृध्दी, मनोविकार, सांध्याचे विकार तसेच सध्याच्या जिवनशैली मुळे निर्माण झालेले अनेक आजार, योग करण्यामुळे कमी होऊ शकतात.

योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास मदत होते. तसेच रोगी रोग मुक्त होण्यामध्ये मदत होते व सकारात्मक उर्जा कायम राहते. असे मत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकियअधिकारी डॉ. मंजिरी खरकाटे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून योग शिक्षक विलास केजरकर यांनी नियमित योग करून आपण आपले शारीरिक मानसिक आणि बौद्धिक आरोग्य उत्तम ठेवू शकतो. नियमित योग केल्याने आपले शर- ीर निर्विकार बनते. मन शुद्ध होते. नकारात्मक ऊर्जा जाऊन विचारांमध्ये सकारात्मकता येत असते. व योगाचे महत्व सांगितले. यावेळी योगशिक्षक विलास केजरकर यांनी ग्रिवा चालन, ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन,शशकासन, वक्रासन, शितली प्राणायाम, कपालभाती, मकरासन, अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायम, नाडीशोधन, भूजंगासन, शवासन, त्रिकोणासन ध्यान असे विविध योगासने प्रात्याक्षिक करुन दाखविले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन औषधी निर्मित्या एस. एस. निंबार्ते यांनी केले तर उपस्थितांचे आभार आरोग्य सेविका जे. बी. सार्वे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता एन.एल. सेलोकर, जी. एम. कावळे, के. एन. राऊत, पायल मोहरकर, आर. पी. निमजे, पदमा घटारे, डब्लु. एल. धकाते, प्रिती कांबडी, वर्षा रामटेके, शोभा रामटेके, शक्तीकुमार शेंदरे, निखिल, विजय मंगलकर, प्राप्ती राघोर्ते, सारंगा मारवाडे, भगवान बुजाडे, निरूबाई बन्सोड, सत्यभामा राघोर्ते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी व नागरिकांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *