बेमुदत संपास राष्ट्रवादी शिक्षक संघाचा पाठिंबा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पुरोगामी विचार सरणीच्या महाराष्ट्र शासनाने शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाºयांना १९८२ ची जूनी पेन्शन योजना पूर्ववत सरसकट लागू करावी या एकमेव न्यायिक मागणीसाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांनी वेळोवेळी सत्याग्रह करून मागणी मान्य करण्याचा आग्रह धरला परंतु शासन याबाबत हेतू पूरस्पर अक्षम्य दुर्लक्ष करून टाळाटाळ करीत असल्याचे नाईलाजास्तव राज्यातील विविध शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी १४ मार्च २०२३ पासून मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत संप पुकारला असून महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सदर बेमुदत संपास राष्ट्रवादी शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर चा जाहीर पाठिंबा असल्याचे नागपूर विभाग प्रांत अध्यक्ष खेमराज कोंडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांना जूनी पेन्शन योजना सरसकट पूर्ववत लागू करण्यात यावी या मागणीसह एन. ई.पी.२०२० रद्द करणे, विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांना सरसकट शंभर टक्के वेतन व वेतनेतर अनुदान अदा करणे, खाजगीकरण, कंत्राटी करण योजना बंद करणे, इतर विभागा प्रमाणे प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू करणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाºयांची विविध संवर्गातील रिक्त पदे भरणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेणे, कमी पट संख्येच्या शाळा कदापिही बंद न करणे, शाळा व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांना संरक्षण देणे, शाळांचा विकास करण्यासाठी पर्याप्त प्रमाणात निधी मंजूर करणे, रात्रकालीन शाळा सुरू ठेवणे, शिक्षक कर्मचाºयांना अशैक्षणिक कामातून वगळणे, सावित्री फातिमा शिक्षक शिक्षकेत्तर कुटुंब कॅश लेश आरोग्य योजना लागू करणे, अनुकंपा तत्वावरील लाभार्थ्यांना सेवेत कायम स्वरुपी सामावून घेणे, शिक्षक शिक्षकेत्तर महिला व पुरुष कर्मचाºयांना केंद्र सरकार प्रमाणे पंधरा दिवसांची पितृत्व रजा आणि दोन वर्षांची बाल संगोपन रजा मंजूर करणारा धोरणात्मक निर्णय घेणे, अतिरिक्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे कोणत्याही विभागात तात्काळ समायोजन करणे,कोरोना या जीवघेण्या आजारात मृत पावलेल्या मृतकांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची आर्थिक मदत करणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाºयांना कायमस्वरूपी सेवा सातत्य संरक्षण देणे या एकमेव न्यायिक मागण्या राज्य शासनाने मान्य करण्यासाठी विविध शिक्षक शिक्षकेत्तर संघटनांनी राज्यभर बेमुदत संपाचे आयोजन केले असून या संपास महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे नागपूर विभाग यांच्यासह नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यातील जिल्हा व तालुकास्तरीय संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *