मोहाडी सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती निवडणूक

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : येथील डोंगरगाव रोडवरील असलेल्या मोहाडी सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मर्या.मोहाडी नोंदणी क्रमांक ६५४ ची निवडणूक रविवार दि.१२ मार्च २०२३ ला सकाळी ८ ते ४ वाजता सरस्वती महिला कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हुमणे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप निर्वाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. वैयक्तिक गटामधून महादेव उरकुडा मोटघरे मोहाडी, जयंत वसंतराव वैरागडे डोंगरगाव, माधवराव तुळशीराम बांते कान्हळगाव, सुभाष रामाजी गायधने मोहाडी, रामप्रसाद मारोती बघेले सिहरी, जयश्री जयपाल गायधने, अनिता नरेश पोटफोडे नेहरूवार्ड मोहाडी, सहकारी संस्था मतदार संघातून बाळू बकराम बारई (३७) मोहाडी, किरण हरिभाऊ अतकरी (३४) जांब, श्रावण सदाशिव कुथे (३१) सालई बुज, रेवाराम ईस्तारी गायधने (२९) वरठी, ईतर मागासवर्गमधून प्रभाकर जानराव बारई (४८८) कांद्री, अनुसूचित जाती/जमातीमधून कमोद श्यामराव सरादे (५२२), भटक्या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्गमधून गिरधारी फागु खेडकर (५०२) डोंगरगाव विजयी झाले. सुरक्षेच्या दृष्टीने मोहाडी पोलीस ठाणेदार प्रदीप पुल्लरवार, उपनिरीक्षक लक्ष्मण जाधव, कातीकराम दुधकावरा यांच्या नेतृत्वाखाली बाळकृष्ण पाठक, सतीश सपकाळ, विनोद लांडगे, सचिन मालाधरे यांच्यासह पाच होमगार्ड कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी करून निवडणूक निकाल निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हुमणे यांनी सायंकाळी ५ वाजता जाहीर करताच विजयी उमेदवारांनी सरस्वती महिला कनिष्ठ महाविद्यालयातून गावातील प्रमुख मार्गांनी गुलाल उधळत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *