एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाघाचे दर्शन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी सालई खुर्द : मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील जांब कान्द्री वनपरिक्षेत्रातील सिहरी येथील शेतकरी महिला सविता महेंद्र पराते, चंदा राजेश वैद्य, वर्षा रामू वैद्य, माया शरणागते, आनंदा अशोक वैद्य हे रामपूर रस्त्याने शेताकडे गहू कापण्यासाठी जात असतांना पट्टेदार वाघ दिसल्याची घटना रविवार दि.१२ मार्च २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता घडली. वाघ बघताच शेतकरी महिलांनी गावाकडे पळ काढला; घटनेची माहिती गावकाºयांना देताच वाघ पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी नागरिकांना वाघाचे पगमार्क दिसून आले. त्यानंतर काही वेळातच सदर घटनेच्या ठिकाणापासून ३ कि. मी. अंतरावरील ताडगाव-सिहरी रस्त्यावर ताडगाव येथील शेतकरी अनिल खैरे यांना वाघ दिसल्याची घटना ७ वाजेच्या सुमारास घडली. सदर परिसरातवाघाने रानडुकरांची शिकार केल्याची घटना घडली आहे, या परिसरात वाघ-वाघिणीचे जोडपे असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. मोहाडी तालुक्यात मागील महिन्याभरापासून वाघाचा मुक्त संचार पहायला मिळत आहे.
त्यामध्ये सालई खुर्द, सिहरी, ताडगाव आणि धोप गावं जणू वाघाचे घर ठरले आहे. दिवस असो की रात्र वाघ शेतात अथवा रस्त्यावर दिसून येत आहेत. यामुळे शेतीचे कामं पुर्णपणे ठप्प झाले आहे. मजूर किंवा शेतकरी शेताकडे जायला घाबरत आहेत. त्यामुळे परिसरातील तब्बल १ हजार हेक्टर जमीन तशीच पडून आहे. त्यामुळे ५ हजार शेतकºयांचे उपजीविकेचे साधन हिरावले गेले आहे. बाहेरुन येणाºया पर्यटकांच्या हौसेसाठी आमचा जीव टांगणीवर का? असा संतप्त सवाल येथील शेतकरी करीत आहे. जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यात वाघ पहाण्यासाठी पर्यटक पैसे खर्च करून येतात. पर्यटक आले पाहिजे म्हणून सरकारही नागझिरावर करोडो रुपये खर्च करत आहे. मात्र पर्यटकांना नागझिरात वाघ क्वचित बघायला मिळतात.
मोहाडीत फुकट वाघ दिसत असल्याने मोहाडीलाच अभयारण्य घोषित करा, असे येथील नागरिक बोलू लागले आहेत. तर दूसरीकड़े वाघाच्या दहशतीने मजूर शेतात यायला तयार नाहीत. जिल्ह्यात उन्हाळी धान लागवड सुरु असून वाघाच्या दहशतीने मजूर यायला तयार नाही. दूसरीकडे रात्री कृषी पंपाला वीज मिळत असल्याने शेतात जायला कुणी सुध्दा तयार नाही. यंदा तब्बल एक हजार हेक्टर पडीत जमीन पडून असल्याचे शेतकरी अजय निमकर यांनी सांगितले. वनकर्मचारी सुद्धा वाघाच्या हल्ल्यात जखमी होताना दिसत आहे. मात्र शेतशिवारात वाघाचा मुक्त संचार रोखण्यास वनविभाग सुध्दा असमर्थ ठरत आहे. वाघाला आवडणारे प्राणी शेतात असल्यामुळे वाघाने आपला ठिय्या वाढवला आहे, असे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *