ऐन दिवाळीत रेल्वेच्या वेटिंगमुळे प्रवाशांची धावपळ

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : दिवाळी साजरी करून जिल्ह्यातील अनेक चाकरमानी पुणे-मुंबईला परत निघतील. पुणे व राज्याची राजधानी मुंबईला जाण्यासाठी सणासुदीच्या काळात रेल्वेचे वेटिंग सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक प्रवासी आरक्षणासाठी धडपड करीत आहेत. २७ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान मुंबईला जाण्यासाठी १०० वेटिंग आहे. यात रेल्वे प्रवासी गोंदिया ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच मुंबई पर्यंत धावणाºया विदर्भ एक्स्प्रेसला प्रथम पसंती देतात. हावडा मुंबई मेल गाडीत स्लीपर कोचमध्ये वेटिंग ५० च्या घरात आहे आणि रोज हा आकडा वाढतच आहे. तुमसर रोड स्थानकात मुंबईकडे जाणाºया मोजक्याच गाड्यांचे थांबा आहे. यामध्ये विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस, हावडामुंबई मेल व शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या तीन गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांच्या व्यतिरिक्त भंडारा रोड (वरठी) स्थानकात गीतांजली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी थांबते. गोंदिया ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत धावणाºया व जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी अत्यंत पसंतीची ट्रेन असणाºया विदर्भ एक्सप्रेस व हावडा-मुंबई मेल ट्रेनमध्ये फक्त दोन जनरल डब्बे व समोर अर्धा डब्बा जनरल आहे.

एक्स्प्रेस गाड्यांमध्ये जनरल डब्यांची संख्या अतिशय कमी राहते. ज्या प्रवाशांना आरक्षण मिळत नाही तेही जनरल डब्यातून प्रवास करू शकतात. परंतु, एक्स्प्रेस गाड्यांना जनरलच्या डबे नाममात्र असल्याने अनेक प्रवासी एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करू शकत नाहीत. रेल्वे प्रवाशांना तत्काळ आरक्षणाची सोय आहे. अनेकांना वेळेवर आरक्षण मिळण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने केली आहे. दिवाळीचा प्रवास केवळ तत्काळ, प्रमियम तत्काळवर करण्याची वेळ आली आहे. प्रीमियम तत्काळ तिकिटे ही भारतीय रेल्वेची एक प्रीमियम सेवा आहे, ज्या अंतर्गत प्रवाशांना प्रवासाच्या १ दिवस आधी तत्काळ तिकिटांतर्गत कन्फर्म तिकीटमिळवण्याची संधी मिळते. प्रवासी प्रवासाच्या १ दिवस अगोदर भारतातील जवळपास सर्व ट्रेनची तिकिटे तत्काळ पद्धतीने रेल्वे स्थानकातील खिडकीवरून अथवा आभासी पद्धतीने बुक करू शकता. प्रीमियम तत्काळ तिकीट ही त्याच तत्काळ कोट्याची प्रीमियम सेवा आहे, ज्या अंतर्गत तत्काळ तिकीटाच्या सुमारे ५० टक्के जागा आरक्षित असतात. प्रीमियम तत्काळ अंतर्गत, प्रवाशांना तत्काळपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात आणि ते शुल्क बदलणारे (डायनॅमिक) आहे, याचा अर्थ प्रत्येक सीट बुक केल्यानंतर तिकीटाची किंमत वाढते. भारतीय रेल्वेमध्ये स्लीपर एसी थ्री टायर एसी ते टायर एसी फर्स्ट क्लासपर्यंत सर्व वर्गांमध्ये प्रीमियम तत्काळ तिकिटे बुक केली जाऊ शकतात.

प्रीमियम तत्काळ तिकिटांचे फायदे

प्रीमियम तत्काळ तिकिटांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. प्रवाशांना प्रवासाच्या १ दिवस आधी कन्फर्मतिकीट मिळते, याचा अर्थ प्रवासी आपत्कालीन परिस्थितीत कुठेही प्रवास करू शकता. प्रीमियम तत्काळ तिकिटे सर्व वर्गांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये कन्फर्म तिकिटेच बुक केली जातात, प्रतीक्षा यादी किंवा आरएसी तिकिटे बुक केली जात नाही. प्रवाशांना स्लीपर क्लासमध्ये प्रीमियम तत्काळ तिकीट बुक करायचे असल्यास, त्याचे काउंटर सकाळी सकाळी ११ वाजता उघडते, तर एसी वर्गात प्रीमियम तत्काळ तिकीट बुक करायचे असल्यास, काउंटर तुमच्यासाठी सकाळी १० वाजता उघडते.

पॅसेंजर गाड्या नसल्याने मोठा फटका

रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्या केवळ नावापुरत्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्याचाही फटका प्रवाशांना बसत आहे. यामुळे मुंबईकडे जाणाया एक्स्प्रेस भरून जात आहेत. किमान दिवाळीत पॅसेंजर गाड्या सुरु केल्यास एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आरक्षण मिळू शकते. विदर्भ व मेल या एक्स्प्रेस गाड्यांना जनरल डबे वाढविण्याची गरज आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *