सेंदूरवाफा येथे अवतरली पंढरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : कार्तिक पौर्णिमा निमित्त दरवर्षी यंदाही सेंदूरवाफा येथे रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त गावात सर्वत्र दिव्यांच्या झगझमगाट, विद्युत रोषणाई व टाळमृदंगाचा गजरात जणू पंढरीच येथे अवतरल्याचे वातावरण तयार झाले होते. १९७७ पासून ह.भ.प.सिताराम महाराज यांनी कार्तिक पोर्णिमा निमित्त रथयात्रेला सुरूवात केली होती. ती परंपरा आजही सेंदूरवाफा वासीयांनी कायम ठेवली आहे. या रथयात्रेचे उद्घाटन प्रसंगी प्रकाश बाळबुध्दे, रवी परशुरामकर, भोजेंद्र गहाने, धनवांता राऊत, शंकर हातझाडे, देवराम कापगते, आणिक निंबेकर, विकास कापगते, वामन नाकाडे, किशोर कापगते, रेवाराम संग्रामे, विलास कापगते, देवेश कापगते, अमोल कापगते यांच्या उपस्थित पार पडले. भाविकांनी रथ यात्रेत विठ्ठलरुखमाईचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. नगरातून भ्रमंतीनंतर येथील झेंडा चौकात भजन स्पर्धा घेण्यात आली. ही परंपरा गेल्या ७७ वर्षापासून सुरू असून ह.भ.प. सिताराम महाराज यांनी जे रोप लावले, त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून त्यांची आठवण म्हणून कार्तिक पौर्णिमेला आठवण म्हणून सेंदूरवाफा येथे रथयात्रेची परंपरा यंदाही उत्साहात साजरी करण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *