दवडीपार/बेला येथे मंडई निमित्त विविध कार्यक्रम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : दिवाळीनंतर भंडारा जिल्ह्यात सर्वत्र मंडई सह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होते. पूर्व विदर्भात सगळीकडेच या मंडळीने उत्सवानिमित्त रात्रीला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावेळी गावातील नागरिक एकत्रित येत सामाजिकतेचा संदेश देत असतात. भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला येथे मंडई कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जय महाराष्ट्र याप्रसंगी माजी सैनिक व कन्यारत्न सत्कार करत पुरस्कार वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे रात्रीला आॅर्केस्ट्राचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बंडूभाऊ सावरबांधे माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, चरण भाऊ वाघमारे माजी आमदार, गंगाधर जीभकाटे अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा, पवन मस्के जिल्हा सचिव काँग्रेस कमिटी भंडारा, माणिक ब्राम्हणकर माजी सभापती,संजू गाढवे, रत्नमाला चेतूले सभापती पंचायत समिती, सुनील लेंडे मुकेश थोटे, सरपंच निशा राखडे, पोमराज लेंडे पो.पा., श्रीकृष्ण राखडे, नरेंद्र पुडके, बबन बांते आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील अनेक गावांच्या सैनिकांना पुरस्कार देत सत्कार करण्यात आला. व महिला भगिनींना कन्यारत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी लाभलेले माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांनी गावाचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष द्यावे. याबद्दल मार्गदर्शन केले तर माजी आमदार चरण वाघमारे यांनी गावाच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करून गावांमध्ये एकोप्याची भावना ठेवावी असा संदेश उपस्थित नागरिकांना दिला. तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी गावामध्ये विकास निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही यावेळी दिली. तर कार्यक्रमाला लाभलेले जनसेवक पवन मस्के यांनी गोसे प्रकल्पाच्या संघषार्ची माहिती नागरिकांना दिली व येत्या निवडणुकीत योग्य उमेदवाराला आपण आपले मत द्यावे तसेच गावात एकोप्याचे वातावरण राहतील यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता बबन बांते, सुनील लेंडे, उत्तम मेश्राम, अरविंद कुथे, आणि संपूर्ण ग्रामवासीयांनी अथक परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *