महाराष्ट्रद्रोही अब्दुल सत्तार यांना जोडे मारो आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना जिल्हाधिका- री यांच्या मार्फत महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबतनिवेदन देण्यात आले. संसदरत्न, खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्यावर अपमानजनक टिका करत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केली व त्यांच्या बद्दल यांनी केलेले विधान अतिशय घृणास्पद आहे.

कृषी मंत्र्यांचे हे विधान एका स्त्री लोकप्रतिनिधीचा अपमान करणारे व समस्त महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लावणारे असून भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कडून सत्तार यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आणि या ई. डी. सरकार विरोधात तिव्र घोषणा देण्यात आले. तसेच त्यांनी जाहिर माफी मागावी व आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी राष्ट्रवादी पक्षाकडून मागणी करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने पक्षश्रेष्ठी जिल्हाध्यक्ष नानाभाउ पंचबुधे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, प्रदेश प्रतिनिधी डॉ श्रीकांत वैरागडे, महिला अध्यक्षा सरिता मदनकर, पंचायत समितीच्या सभापती रत्नमाला चेटूले, युवक अध्यक्ष यशवंत सोनकुसरे, युवती अध्यक्षा अ‍ॅड नेहा शेंडे, नरेंद्र झंझाड, बाबुराव बागडे, हेमंत महाकाळकर, गणेश चौधरी, आरजु मेश्राम, राहुलदादा निर्वाण, सुनिल साखरकर, राजू पटेल, जुमाला बोरकर, अश्विनी बुरडे, शुभांगी खोब्रागडे, किर्ती गणविर, नागेश भगत, हितेश सेलोकर, अश्विन बांगडकर, लोकेश नगरे, जवाहर निर्वाण, शेखर गभने, बंडू चेटूले व फार मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *