जिल्ह्यात ७८.२२ टक्के मतदान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील ३०५ ग्राम पंचायतीसाठी आज दिनांक १८ डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. सकाळच्या वेळी मतदानाच्या सुरूवातील मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद दिसुन आला मात्र नंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पहावयास मिळाली. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ७८.२२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती.त्यामध्ये लाखांदुर तालुक्यात सवार्धीक ८२.६२ टक्के मतदानाची नोंद झाली असुन सर्वाधीक कमी ७४.६४ टक्के मतदानाची नोद तुमसर तालुक्यात करण्यात आली. २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असुन विजयाची माळ कुणाच्या गळयात पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागुन आहेत. जिल्ह्यात तुमसर,भंडारा, पवनी, साकोली,लाखनी व लाखांदुर या सहा तालुक्यातील ३०५ ग्राम पंचायतीकरीता आज सकाळी ७.३० वाजेपासुन मतदानाला सुरूवात झाली.थंडीचे दिवस असल्याने मतदारांनी सकाळच्या वेळेस मतदानास जाणे टाळल्याचे दिसुन आले त्यामुळे सकाळी ११.३० वाजेपर्यंत फक्त ८ टक्के मतदानाची नोंद झाली.

मात्र दुपार पर्यत मतदान केद्रावर मतदारांची गर्दी दिसुन आली. त्यामुळे सायं.५.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ७८.२२ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामध्ये तुमसर तालुका ७४.६४ टक्के,भंडारा तालुक्यात ७४.९१ टक्के,पवनी तालुक्यात ७८.२८टक्के, साकोली तालुक्यात ८०.६५ टक्के, लाखनी तालुक्यात ८०.४९ टक्के व लाखांदुर तालुक्यात ६२१.६२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये ३६५८७१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.जिल्ह्यात मतदान केंदावर कुठलाही अनुचित प्रकार घडु नये याकरीता पोलीस विभागातर्पेष्ठ चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तर अपंग व वयोवृध्द मतदारांना मतदान केद्रापर्यंत पोहचविण्याकरीता अनेक ठिकाणी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *