पाल्यांना शिक्षणासोबत सामाजिक ज्ञान देणे गरजेचे : आ. भोंडेकर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: आपल्या पाल्यांना केवळ शिक्षण देणे पुरे नाही तर त्यांना अभ्यासा सोबत सामाजिक ज्ञान देणे हि आजची गरज आहे. पाल्यांना सामाजिक ज्ञान आले कि त्यांना पारिवारिक जीवन हि सुखी होऊ शकते आणि असे झाले तर समाजात निर्माण झालेली भीती संपण्यास वेळ न लागण्याचे वक्तव्य आ. नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले. ते येथील श्री संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ द्वारा आयोजित तेली समाजाच्या उपवर वधू परिचय संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करीत होते. आ. भोंडेकर पुढे म्हणाले कि आपल्याला हवा असलेला जीवांसाथी पैश्याने मोजण्यापेक्षा त्यला त्याच्या संस्काराने मोजाल तरच जीवन सुखी होवू शकतो. कारण कोणतेही काम छोटा असो किंवा मोठा हे महत्वाचे नसते करण आत्मविश्वास असला कि छोट्या कामालाही मोठे करता येते. समाजकारण करताना राजकारण आडवे आल्या नाही पाहिजे. भंडारा हा पुढील १५ वर्षात पूर्णपणे बदलेल अशे आश्वासन देत आ. भोंडेकर पुढे म्हणाले कि गेल्या 75 वर्षात राजकीय इच्छा शक्ती कुठेतरी कमी राहिली, म्हणून समाजाच्या विकास करिता येणारा पैसा सुद्धा रस्ते आणि नाल्या बांधण्यातच खर्च केल्या जात होता. पण आता तसे होणार नाही समाजाच्या उत्थाना करिता आलेल्या लावला जाईल.

इतकेच नव्हे तर नगर परिषदेच्या ११ शाळां पैकी फक्त आज चारच शाळा शिल्लक राहिल्या आहे. त्यांना निधी देऊन सुधारणा तर केल्या जात आहेच सोबतच गोरगरिबांच्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून या संपूर्ण ११ शाळा पुरवत उघडण्याची हमी आ. भोंडेकर यांनी दिली. कार्यक्रमात मंडळाचे पदाधिकारी धनराज खोब्रागडे, विनोद मानापुरे, आशु वंजारी, सेवकभाऊ कारेमोरे धनराज साठवणे, राहू शहारे, जगनन कुंभलकर पुरुषोत्तम वैद्य, शोभाताई बावनकर, कल्पना नवखरे रंजना भिवगडे उद्धव डोरले, नितीन मलेवर, नत्थू कारेमोरे,आणि एम.एल. भुरे महे मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रम दरम्यान भंडारा येथे निर्माण केल्या जाणार्या नाट्यगृहाला संताजी जगनाडे महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी श्री संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळातर्फे आ. नरेंद्र भोंडेकर यांना करण्यात आली. ज्यावर आम. भोंडेकर यांनी या मागणी ला पूर्ण करण्या करिता पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत सांगितले कि नाट्यगृह हे नगर परिषदेचा विषय असल्याने त्याला नाव देण्याचा ठराव नगर परिषद घेणार. करिता मंडळाने या विषयाचे एक निवेदन लवकरात लवकर नगर परिषदेला द्यावे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.