‘लेखक आपल्या भेटीला’ आणि ‘गझल सादरीकरण’ उपक्रमाचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्थानिक प्रगती महिला कला महाविद्यालयात, मराठी भाषा अभ्यास मंडळाच्यावतीने प्राचार्य डॉ. श्यामकुमार चरडे यांच्या मार्गदर्शनात आणि महाविद्यालयीन विकास समिती सदस्य प्रशांत देशकर यांच्या अध्यक्षतेत ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत भंडाºयातील प्रसिद्ध साहित्यिक प्रमोदकुमार अणेराव यांची मुलाखत आयोजित होती.

मराठी विभाग प्रमुख डॉ. जयश्री सातोकर यांनी मुलाखत घेतांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना, अणेराव सरांनी आपले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी कारणाभूत ठरलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन; कवी, कथाकार, चित्रकार, रेखाटनकार म्हणून झालेला प्रवास वर्णन केला. परिस्थितीने घडवलं, संकटांनी शिकवलं आणि अनुभवांनी समृद्ध होत गेलो. अवतीभवतीची माणसं वाचत गेलो. निरीक्षणांनी जे स्फुरलं, हृदयाला जे भावलं तेच काव्यातून मांडत गेलो. रसिकांना रिझविण्यासाठी, त्यांची दाद घेण्यासाठी मी कधीच लिहिले नाही; तर सभोवतालच्या जगाचं वास्तव मांडतांना अंतर्मुख होत गेलो आणि कवितेतून, कथेतून, रेखाटनातून व्यक्त होत गेलो. जे काही मांडल ते हृदयातून आलं. प्रसिद्धीचा हव्यास कधीचनव्हता. अशी प्रामाणिक भूमिका त्यांनी मांडली.

 

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *