आयुध निर्माणी भंडारा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बोंद्रे व उपाध्यक्षपदी योगेश झंझाड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर :- जवाहर नगर आयुध निर्माणी भंडारा कर्मचारी सहकारी पतसंस्था जवाहरनगर च्या अध्यक्षपदी इंद्रपाल बोंद्रे व उपाध्यक्ष पदावर योगेश झंझाड़, सचीवपदी विजय मडामे व कोषाध्यक्ष पदावर ओम प्रकाश धुर्वे इत्यादींचे निवड आज करण्यात आले आहे, आज अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, व कोषाध्यक्ष इत्यादी पदावरील निवडी करिता संचालक मंडळातील सदस्यांद्वारे निवड करण्याकरिता आयोजित आयुध निर्माणी भंडारा कर्मचारी सहकारी पतसंस्था जवाहर नगरच्या सभागृहात ११ संचालक मंडळातून निवडणुक घेण्यात आले. त्यात अध्यक्ष इंद्रपाल बोंद्रे , उपाध्यक्ष योगेश झंझाळ, सचिव विजय मडामे,कोषाध्यक्षपदी ओम प्रकाश धुर्वे इत्यादींना प्रत्येकी ६ मते मिळाली तर विरोधी पक्षातील अध्यक्ष पदावरील उम्मेदवार अजय बोरकर उपाध्यक्ष पदातील प्रफुल्ल देशपांडे,कोषाध्यक्ष पदातील ढोरे व सचिव पदातील सतदेवे यांचे नामांकन अर्ज भरण्यात आले होते त्यांना प्रत्येकी ५ मते मिळाली. विजयी पदाधिकाºयांनी आयुध निमार्णी भंडारा कर्मचारी सहकारी पतसंस्था जवाहर नगर मधील सर्व भाग धारक,सभासद ,निमार्णी कर्मचारी, बीएमएस कर्मचारी संघटना पदाधिकारी, कोअर कमिटी सदस्य, सह जय गोपाल सिंह , लील्हारे, नत्थू शेंडे, राजेश बिशेन श्रीकांत इंगले ,सुनील कृपाने, पंकज साकुरे इत्यादींचे विजयी उमेदवारांनी आभार व्यक्त केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *