जिल्हा बँकेकडून मृत शिक्षकाच्या पत्नीला २५ लाख रुपयाच्या विम्याचा लाभ

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक आपले खातेदार, भागधारक यांच्या हिताकरिता व त्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्याकरिता सदैव प्रयत्नशील राहते. तसेच दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या सभासद तसेच भागधारक कुटुंबांना आर्थिक आघातातून सावरण्यासाठी नेहमीच तप्तर असते, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी व्यक्त केले. साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात व्याख्याता म्हणुन सुरेंद्रकुमार दिवाकर राऊत कार्यरत होते. त्यांचे १७ एप्रिल २०२३ रोजी अपघाती निधन झाले. त्यांचे वेतन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत असलेल्या बँक खात्यावर जमा होत असल्याने त्यांना अपघात विमा योजना लागु होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना विम्याचा लाभ देण्यात आला. २५ लाख रुपयाचा धनादेश जिल्हा मध्यवर्ती बँकेकडुन मृत झालेल्या शिक्षकाच्या पत्नी कुंदा राऊत यांना देण्यात आला. यासाठी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बरडे, लेखा विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच साकोली शाखा प्रमुख रविंद्र लिमजे यांनी अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या मार्गदर्शनात अपघात विमा दाव्याकरिता सतत पाठपुरावा केला आणि ३ महिण्याचे आत विमा दावा मंजुर करवुन घेतला.

जिल्ह्यातील खाजगी अनुदानीत शाळांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखेत असलेल्या बँक खात्यावर जमा होत राहतात. त्यामुळे खाजगी अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बँक विविध प्रकारच्या सुविधा वेळोवेळी पुरवत असते. यापैकी एक सुविधा म्हणजे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत वेतन घेणाऱ्या खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बँकेने दिलेली आहे ती म्हणजे “अपघात विमा योजना! या विमा योजने अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांचे सेवाकाळात अपघाती निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना अपघात विमा योजने अंतर्गत २५ लाख रुपयांचा विमा दिला जातो. म्हणजेच अर्थसहाय्य केले जाते. बँकेनी ही सुविधा १ सप्टेंबर २०२१ पासून खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना “सॅलरी पॅकेज’ अंतर्गत लागू केली आहे. ही सुविधा या योजनेच्या सभासदांना पूर्णपणे नि:शुल्कअसून, बँक या विम्याच्या वार्षिक प्रीमियम भरत असते. जिल्ह्यातील ३३७७ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बँकेकडे नोंदणी केली आहे. या अंतर्गत राऊत यांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ देण्यात आला. ३१ ऑगस्ट रोजी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत स्व. सुरेंद्रकुमार राऊत यांच्या पत्नी कुंदा राऊत यांना बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या हस्ते २५ लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *