करो योग रहो निरोग….२५ वा गुरुपौर्णिउत्सव साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जनार्दनस्वामी प्रणीत भंडारा योगाभ्याया मंडळाचा रौप्य वर्षिय गुरुपौर्णिमा उत्सव सोमवार दि. दि.३ जुलै रोजी बं.ला. नूतन महाराष्ट्र शाळा, भंडारा येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात नियमीत दीपप्रज्वल गुरुपूजनाचे योगा-अभ्यासाच्या वर्गानंतर करण्यात आले. कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष नारायण चोले, कार्यवाह दिपक व्यवहारे आणि माजी अध्यक्ष डॉ प्रदीप मेघरे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. रौप्य वर्षा निमित्य कार्यवाहांनी संस्थेची वाटचाल आपल्या प्रास्ताविकात सादर केली. याप्रसंगी अध्यक्षांनी नवनियुक्त उपाध्यक्ष्य यांना सर्वांनी शुभेच्छादिल्या. तसेच प्रमुख पाहुण्यांनी ‘करो योग रहो निरोग’ हा संदेश देऊन आपके विचार मांडले. नवनियुक्त उपाध्यक्षांनी देखील सभेला शुभेच्छा दिल्या.

वैयक्तीक प्रजन व समर्पणाचा कार्यक्रमाने सांगता करण्यात आली संचलन योग साधक व उपाध्यक्ष हेमंत चंदवासकर यांनी केले. यावेळी सौ.नंदा तिडके, पौर्णिमा डोरले, उषा गभने, कृष्णराव कुक- डकर, माजी.पोलिस.रेहपाडे, मोहबनशी सर, नचिकेत मते, बाळकृष्ण सार्वे, संजय मते, वीरेंद्र गभने आदी योग्य अभ्यासक प्रामुख्याने उपस्थित होते. तर बन्सीलाल लाहोपी नूतन महाराष्ट्र विद्यालय खात रोड भंडारा यांचे योग अभ्यासक यांनी आभार व्यक्त केले आहे. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी योगाअभ्यासाचे प्रात्यक्षिके केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *