गुरूपौर्णिमेला मोतीरामबाबा आश्रमात भक्तांची रिघ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : जवळील सावरबंद येथील श्री संत विदेही मोतीरामबाबा आश्रम या विदर्भात प्रसिद्ध गुरुदेव माऊली देवस्थानी आज गुरूपौर्णिमेच्या शुभ पर्वावर हजारो भक्तांची दर्शनाकरिता रिघ लागली होती. अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अकोला जिल्ह्यातील दहा ते पंधरा हजारांवर भक्तांनी हजेरी लावित महाआरती व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी साकोली पोलीसांनी सावरबंद परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. श्री संत विदेही मोतीरामबाबा आश्रम सावरबंद येथे दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या शुभ पर्वावर मोठी जत्रा भरते. देवस्थानात दर्शनासाठी विदभार्तील आठ ते दहा जिल्ह्यातून मोठया संख्येने भक्तभाविकांचा जनसागर उसळतो. येथे पसायदान आणि महाआरतीला भाविक आवर्जून उपस्थित रहातात.

यावेळी संत गुरूमाऊलीचे प्रवचन येथील संत विदेही ह.भ.प. वसंता बेंदवार यांच्या मधूर वाणीतून झाले. प्रसंगी सरपंच माधवी बडवाईक, ह.भ.प.विठ्ठलदास मेंढे, ह.भ.प. गणेश सेरेकर, ह.भ.प.साधूजी बडवाईक आणि आश्रमातील सर्व गुरूमाऊली सदस्यांनी विशेष सहकार्य करीत गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी साकोली ठाण्यातील पोलिस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सुनील उईके, पोलिस नायक स्वप्निल गोस्वामी, सचिन राऊत, शिपाई शुभम घाटबांधे व चमूने सुरक्षेच्या दृष्टीने चोख व्यवस्थाठेवली होती. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सावरबंद येथील सर्व सदस्यांनी तसेच ग्रामवासीयांनी मोलाचे योगदान दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *