शेळीच्या स्तनाजवळील कातडीच्या पोकळीत गर्भाची वाढ; वैद्यकीय शास्त्रातील दुर्मिळ घटना

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : साकोली तालुक्यातील विर्शी येथे येथील शंकर कावळे यांच्या शेळीला गर्भाशय व पोटाच्या बाहेर कासेजवळ ढिल्या चामडीच्या आतील जागेत (सबक्यूटानिअस) गर्भधारणा झाली व पूर्ण वाढ झाली. विशेष म्हणजे छातीची पोकळी, पोट व श्रोणी पोकळीच्या बाहेर शरीराच्या कोणत्याही महत्वपूर्ण अवयवांचे संपर्कात हे गर्भ नव्हते. वैदयकीय शास्त्राला नवे दिशादर्शन व धक्का देणारी ही दुर्मीळ घटना ३० जून रोजी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे उघडकीस आली. स्त्री असो की कोणताही मादा प्राणी, नर व मादा बिजांच्या संयोगाने फलित गभार्ची वाढ गर्भाशयात होवून बाळाचा/ पिल्लांचा जन्म होतो.

साधारणपणे, फलित अंडी गर्भाशयाच्या अस्तराला जुडते व गर्भ पिशवीत वाढतात. गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक तसे नैसर्गिक वातावरण गर्भाशयातअसते. परंतु, लाखातून एखाद्या वेळेस एक्टोपिक गर्भधारणा संभवते. जेव्हा नर व मादा बिजाचा संयोग होवुन फलित अंडी गर्भाशयाच्या मुख्य पोकळीबाहेर प्रत्यारोपित होते आणि वाढते. अशी गर्भधारणा बहुतेकदा फॅलोपियन ट्यूबमध्ये होते, जी ट्यूब अंडाशयातून गर्भाशयात अंडी वाहून नेते. एक्टोपिक गर्भधारणेला ट्यूबल गर्भधारणा असे म्हटले जाते. कधीकधी एक्टोपिक अशी उघडकीस आली घटना विर्शी येथील शेतकरी शंकर कावळे यांच्या शेळीच्या कासेवर सुजन व कास खुपच कडक झाले होते. शेळीचा गर्भधारणेचा कालावधी साधारणत: पाच महिन्यांचा असतो. परंतु, सहा महिन्यानंतरही शेळीची प्रसूत झाली नव्हती. याआधी तीन डॉक्टरांच्या औषधोपचारानंतरही सुजन कमी झाली नव्हती.

त्यामुळे त्यांनी शेळीला दवाखान्यात गर्भधारणा शरीराच्या पोटात किंवा गर्भाशयाचा तपासणीसाठी आणले. डॉ. गुणवंत भडके यांनी खालचा भाग म्हणजे सर्विक्समध्ये होते. सर्विक्स गर्भाशयाचा भाग असून तो योनीला जोडतो. परंतु, एक्टोपिक गर्भधारणा गर्भ पूर्ण कालावधीपर्यंत टिकू शकत नाही. तसेच वाढत्या ऊतीमुळे जीवघेणा रक्तस्त्राव होऊ शकतो. शेळीची तपासणी केली असता त्यांना कासेच्या (स्तनाच्या) जवळ पोटाखाली कडक सुजन व खराब वास येत असल्याचे लक्षात आले. शेतक?्याला विश्वासात घेत त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *