टिप्परने केला वृद्धाचा चेंदामेंदा

पवनी : ग्रामीण रुग्णालय पवनी येथून उपचार घेऊन घरी परततांना गिट्टी भरून जाणाºया टिप्परने एका वृद्धाला जबर धडक देऊन त्याच्या शरीराचा चेंदामेंदा केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता घडली. यातील मृतकाचे नाव लहू वैद्य वय वर्ष ८२ राहणार बस्तारवारी वॉर्ड असे असून टिप्पर क्र. एमएच -४० बीजी ०५९० असा आहे. यातील मृतक आरोग्य सेवा घेऊन गौतमनगर मार्गे घरी जात होता. निलजकडून वैनगंगा नदीकडे जाणाºया महामार्गावर मृतक लहू वैद्य रस्ता ओलांडत असतांना टिप्परने जोरदार धडक दिल्याने लहू वैद्यचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान लाखांदूरचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे पवनीला येत असतांना मृतक रस्त्यावर पडला असल्याचे दिसले. लगेच त्यांनी पवनी पोलिसांना पाचारण करून कारवाई सुरू केली. पळून गेलेल्या टिप्परचा पाठलाग करून पोलीसांना टिप्परला पकडण्यात यश आले. यावेळी टिप्पर चालक फरार झाल्याने टिप्परला एस टी डेपोत जमा करण्यात आले असून पुढील कारवाई पवनी पोलीस करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, ठाणेदार नरेंद्र निस्वादे, एपीआय सुनील राऊत यांचेसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *