दोन दुचाकींच्या अपघातात युवक गंभीर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : येथील शिवाजी चौका- कडून पोलीस स्टेशन समोरील जिल्हा परिषद शाळेकडे बहिणीला घ्यायलाजात असतांना, स्टेट बँकेसमोर विरूद्ध दिशेने भरधाव येणाºया दुचाकीस्वाराने यु टर्न घेत माँ ट्रेडर्स समोर जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन पाय मोडल्याची घटना गुरूवारला (ता.१३) दुपारी १ वाजता सुमारास माँ ट्रेडर्स लाखांदुर समोर घडली आहे. सौरभ पुंडलिक राऊत (२३) रा. मांढळ, ता. लाखांदुर, जिल्हा भंडारा असे घटनेतील जखमीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार घटनेतील जखमी हा लाखांदूर येथील शिवाजी चौकाकडून पोलीस स्टेशन लाखांदुर समोरील जिल्हा परिषद शाळेकडे लहान बहीनीला घ्यायला जात होता. आपल्या एम.एच. ४९, ए.सी. ९३१३ या क्रमांकाच्या मोटार सायकलने जात होता. अशातच समोरून भरधाव वेगाने येणाºया बजाज प्लँटिना एम.एच. ३६, ए.ई. ५०७९ क्रमांकाच्या मोटरसायकलने येत असलेल्या अज्ञात मोटरसायकल चालकाने स्टेट बँक इंडिया लाखांदुर शाखे समोरून यु टर्न घेत माँ ट्रेडर्स समोर जखमीच्या दुचाकीस धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या उजव्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनास्थळी जमलेल्या गर्दीने जखमीस ग्रामिण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याच्या उजवा पाय मोडल्याने त्यास ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती लाखांदुर पोलिसांना होताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गणपत कोल्हे, पोलीस नायक प्रमोद टेकाम यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. धडक देणाºया दुचाकीस्वाराचे नाव अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात लाखांदुर पोलीस करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *