सातोनाच्या प्रतिभा बडवाईकचा गावकºयांनी केला जाहीर सत्कार

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी: तालुक्यातील सातोना येथील लक्ष्मण बडवाईक यांची नातीन फौजदार कु.प्रतिभा नत्थू बडवाईक होय.वडील शेतकरी असून व शेतीला पूरक म्हणून गावात इलेक्ट्रिकचे छोटेसे दुकान चालवितात. परिस्थिती जेमतेमच आहे.देवेंद्र व खोमेश हे दोन लहान भाऊनी आयटीआय प्रशिक्षण घेऊन वडिलांना दुकानात हातभार लावतात. मात्र शिक्षणाची आवड आणि वडिलांनी ती कमी होऊ दिली नाही. दहावीनंतर साकोलीच्या शासकीय महाविद्यालयात पॉलिटेक्निक पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. ही पदवी पूर्ण केल्यानंतर कॉलेजला झालेल्या मुलाखतीमध्ये तिला एका कंपनीची चांगल्या पगाराची आॅफर आली. ती स्वीका- रण्याऐवजी एमपीएससीची तयारी सुरू केली. २०२० ला एमपीएससीची प्राथमिक परीक्षा दिली. त्यानंतर मात्र कोरोनाच्या कारनाने पुढची परीक्षा रखडत गेली. अखेर यावर्षी या परीक्षेची मेन्स परीक्षा झाली. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये नाशिकला शारीरिक चाचणी परीक्षा व मार्चमध्ये पुण्याला मुलाखत झाली. यात ३७३ गुण घेत प्रतिभा फौजदार झाली.

यादरम्याने रेल्वेचे ग्रुप डी व आरपीएफमध्येही यश मिळविले होते. आपल्या गावीच परीक्षेची पूर्ण तयारी केली. मात्र मैदानी प्रशिक्षणासाठी तिला नागपूर गाठावे लागले. येथे बेटियां शक्ती फाउंडेशन नागपूर संचालित ‘क्लिक टू क्लाउड वीमेन स्पोर्टिंग क्लब’ मध्ये प्रवेश घेत तीन महिने मैदानी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणाची खूप मदत झाली. यानिमित्ताने मोहाडी तालुक्यातील सातोना येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाच्या वतीने कु.प्रतिभा नत्थू बडवाईक नागरी सत्कार गुरुवार दि.१३ जुलै २०२३ ला ग्रामपंचायत कार्यालय सातोना येथे ठेवण्यात आले. याप्रसंगी मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश हटवार, नाना हटवार, भाऊराव डायरे, श्रीधर हटवार, नलिनी हटवार, नत्थु बडवाईक, डूलीचंद वाघमारे, भाऊराव वंजारी, संजय हटवार, राजू वंजारी, सुभाष बडवाईक, गणेश हटवार, रामेश्वर हटवार, प्रदीप वंजारी, अश्विनी हटवार, दीप्ती वंजारी, उषा हटवार, ज्ञानेश्वरी बेलेकर, कमला हटवार, करुणा गजभिये, कुंदा बडवाई, रूपाली वाघमारे, सविता हटवार, रेशमा बालपांडे यांच्या उपस्थितीमध्ये शाल व श्रीफळ देऊन फौजदार कु.प्रतिभा नत्थू बडवाईकचा जाहीर सत्कार करण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *