भंडारा शहरात ५ जनांनी मिळून केला एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी – भंडारा : शहरात हि घटना ३० तारखेला घडलेली आहे. माहीती नुसार एक अल्पवयीन मुलगी भंडारा येथील बसस्थानकावर आली व तिथून एका मुलांसोबत निघून गेली नंतर ती मुलगी भंडारा शहरातील तुकडोजी पुतळा येथे रात्री दरम्यान एकटीच आली तिथे काही मुलं बसलेले असता ते त्यांच्या कडे गेली व नंतर एका मुलानी संधी साधून बाकी मुलांना बोलवले व तिला २८/६/२०२३ ला जलाराम चौकातील करन खेताडे या मुलांच्या रूम वर तिला नेन्यात आले नंतर तिच्यावर २८/६/२०२३ ला तिचा शोषण करण्यात आला व नंतर तिला भोयर या आरोपीच्या खोलीत ठेवून दुसऱ्या दिवशी सुध्दा तिच्यावर अत्याचार करण्यात आले.

मुलगी लापता असल्याने मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे व नंतर मुलीच्या तक्रारीवरून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपीची नावे करण खेताडे, पवन निखार, हितेश उर्फ बांगा निनावे , राॅनी कोटांगले व भोयर असे पाच आरोपी आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक बारसे करीत आहे.यातील आरोपी जलाराम चौकातील व लहरीबाबा आश्रम व राममंदिर वार्ड भंडारा येथील आहेत.एका आरोपीचा पानटपरी तुकडोजी पुतळा भंडारा येथे आहे…मुलीने भंडारा येथील पोलिस ठाण्यात तक्रार रविवार दिनांक ९/७/२०२३ ला केली आहे व पोलिसांनी आरोपींना मंगळवार दिनांक ११/७/२०२३ ला रात्री १ वाजता ताब्यात घेतले..

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.