पवन मस्के यांच्या पुढाकाराने अखेर त्या खड्डयांची डागडुजी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरापासून जवळच असलेल्या गणेशपुर येथील पुलावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडले होते त्यामुळे या रोडवरून ये-जा करणाºया नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता याची तक्रार अनेक नागरिकांनी जनसेवक पवन मस्के यांच्याकडे केली सध्या नवरात्रीचे पर्व सुरू असून याच रोडवर कोरंबी देवी हे पिंगलेश्वरी मातेचे प्रसिद्ध देवस्थान आहे नवरात्र भर भाविक लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. अशातच या नागरिकांना ये-जा करण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागत होता. याची गंभीर दखल काँग्रेस नेते तथा जनसेवक पवन मस्के यांनी घेतली व त्यांनी तात्काळ या रोडवरील खड्डे बुजवण्याकरिता पुढाकार घेत चुरी चा वापर करून हे खड्डे बुजविण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी जनसेवक पवन मस्के यांचे आभार व्यक्त केले आहे. यापूर्वी देखील जनसेवक पवन मस्के यांच्या पुढाकाराने गणेशपुर येथील मुख्य प्रवेशदरावर असलेले खड्डे बुजविण्यात आले होते. गणेशपुर येथे मुख्य दारावर असलेल्या दुकानांच्या समोर एक मोठा खड्डा अनेक दिवसांपासून पडला होता मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. तर स्थानिक दुकानदारांनी जनसेवक पवन मस्के यांना ही बाब सांगितली असता त्यांनी तो खड्डा देखील तात्काळ बुजविला होता. जनसेवक पवन मस्के यांच्याकडून वेळोवेळी होत असलेले लोकोपयोगी कामे बघता नागरिकांनी जनप्रतिनिधी असावा तर असा असे उद्गार काढले आहे हे विशेष…

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *