विश्वकल्याणाच्या पाथना भारतीयानीच गायल्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: भागवत हे शास्त्र आहे, ते श्रवण करताना जिज्ञासा असायलाच हवी. भारतीय ॠषीमुनींनी रचलेल्या ॠचा म्हणजे विश्वकल्याणाच्या प्रार्थना आहेत, असा विचार भागवत कथेतून हरीभाऊ महाराज यांनी मांडला. खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाच्या मागील सहा दिवसात हरीभाऊ नितूरकर महाराज यांनी, भारतीय संस्कृती व परंपरा यांची महती सांगताना सहजपणे सांगितली. यावेळी त्यांनी समकालीन प्रासंगिकही उलगडून दाखवित कठेच्या माध्यमातून श्रोत्यांच्या अंत:करणाचा ठाव घेतला. कृष्णाचे गोकुळात आगमन, कृष्ण बलराम यांचे मथुरागमन, कंसवध, कालयवन मृत्यू, रक्मिणीचे पत्र, सुदेव पाचिका, रुक्मिणी हरण, कृष्ण रुक्मिणी विवाह असे कथाप्रसंग महाराजांनी सांगितले. मुळात भागवतकथा गोड, त्यात भाऊ महाराजांची रसाळ व कर्णमधुर वाणी श्रोत्यांची उत्कंठा यामुळे भागवतकथेला प्रचंड प्रतिसाद लाभतो आहे. महाराज केवळ कथाच सांगत नाहीत तर कथेच्या माध्यमातून प्रगल्भ व विवेकी समाज निर्मिती व्हावी या विषयीचे शास्त्र तसेच संकेत कालोचित पद्धतीने विवरून सांगतात. हे या भागवत कथेचे वैशिष्ट्य होय. भागवत कथा धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा अनेक आयामांना स्पर्श करत असून अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.

भागवतातील अनेक स्थळे आजही अस्तित्त्वात असून तिथे प्राचीन संदर्भ व संकेत दिसून येतात यावरून भारतीय ग्रंथाची प्रामाण्यता पटू लागते. महाराजांनी उषाहरण, मृगराजाचे चरित्र, जरासंध वध आदि प्रसंग अतिशय खुलवून सांगितले. भागवत सप्ताहाच्या आजच्या सांगता दिवशी महाराजांनी सुदामा चरित्र, श्रीकृष्णाचे निजधाम गमन विविध प्रसंगांना आपल्या वाणीतून श्रोत्यांपुढे माणूस. या प्रसंगांनी उपस्थित असंख्य श्रोत्यांचे डोळे पानावले होते. भागवत कथेच्या पहिल्या दिवशी असलेल्या उत्साहापेक्षाही अधिक उत्साह आज जाणवत होता. सुरूवातीला डॉ. विवेक पतकी यांचे निवेदन, भागवत सेवा समितीच्या भजनी मंडळाचे सुश्राव्य भजय गायन, गजर तसेच कथेनंतर, भजन संध्या, सुंदरकांड पठण आदि विविध कार्यक्रम वृंदावन धाम (भागवत कथा स्थळ) येथे होत असून संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेले दिसून येते. सप्ताहाची सांगत असल्याने आज नगरातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी प्रचंड जनसमुदाय यात सहभागी झाला होता. सात दिवसाच्या या धार्मिक यज्ञाने नगरातील वातावरण भक्ती रसात न्हाऊन निघाले होते. खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून ही पुण्यप्राप्ती झाली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.