कारगिल सेक्टर मध्ये शहीद गणपत तितीरमारे यांना श्रद्धांजली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- कारगिल सेक्टर ६९ एफ डी आर्टीलरी रेजिमेंट मध्ये कार्यरत असताना दि. ११ डिसेंबर १९९४ ला मुरमाडी / सावरी येथील शहीद स्व. गणपत श्रीपत तितीरमारे हे कारगिल येथे शहीद झाले. त्यानिमित्त लाखनी तालुका माजी सैनिक संघटना यांच्यावतीने त्यांच्या राहत्या घरी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रकाश भुते सचिव अमित वाघाये कोषाध्यक्ष चंद्रमणी वैद्य सदस्य विजय रामटेके, कन्हैया करिये, श्रावण कानतोडे, सुनील गिहेर्पुंजे वीरपत्नी उर्मिला तितीरमारे, आई अंजना तितीरमारे, मुलगा आशिष तितीरमारे व सून मेघा तितिरमारे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *