पिसाळलेल्या श्वानाचा पाच जणांना चावा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरातील नवीन कोर्ट व साई मंदिर परिसराकडे सकाळी व्यायामासाठी फिरायला जात असणा-या नगरिकांना पिसाळलेल्या श्वानाच्या चाव्याने पाच ते सहा जण जखमी झाले असून या श्वानाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अचानक कुठूनतरी एक पिसाळलेला श्वान आला. समोर दिसेल त्याला चावण्यास त्याने सुरुवात केल्याने एकच घबराट पसरली. एक महिला घरासमोर रांगोळी काढत असतांना श्वानाने या महिलेवर हल्ला करून जखमी केले तर पंकज शेंडे नामक युवकाच्या दोन्ही डोळ्यावर हल्ला करत त्याला गभीर जखमी केले आहे.

जर त्याचे दोन्हीडोळे निकामी झाले तर त्याला जवाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या पिसाळलेल्या श्वानाने चार ते पाच नागरिकांना चावा घेतला. जखमी झालेल्या सर्वांना तुमसर येथील सुभाषचंद्र बोस रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे. मात्र पंकज नामक युवकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे. हा श्वान पिसाळलेला असल्याने तो अजूनही इतरांसाठी धोकादायक झाला आहे. या श्वानापासून सर्वांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. शहरात सध्या मोकाट श्वानांची संख्या चांगलीच वाढली आहे. या श्वानांकडून अनेकवेळा पहाटेच्यावेळी व्यायामासाठी फिरणाºया नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.                          प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरज

मोकाट श्वानांच्या शस्त्रक्रियेसाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च करण्यात येतात मात्र शहरात मोकाट श्वानाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाकडून कुत्र्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. त्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *