खापा (खु.) आश्रमशाळेत उन्हाळी शिबीर व विशेष शिकवणी वर्गाचा समारोप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा अंतर्गत जिल्ह्यातील एकमेव शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खापा (खु.) येथे इयत्ता ९ ते १० करीता दिनांक १२ एप्रिल २०२३ ते ९ मे २०२३ या कालावधीत निवासी स्वरुपाचे विशेष शिकवणी वर्ग आणी त्यासोबतच विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना चालना देण्याकरीता उन्हाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी विकास विभाग नागपूरचे अप्पर आयुक्त मा. रविन्द्र ठाकरे आणि प्रकल्प अधिकारी मा. निरज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वर्गाचे व शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात एकुण ४४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

वरच्या वर्गाच्या अभ्यासासोबतच व्यक्तिमत्व विकास, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, शारिरीक व्यायाम, योगा, कराटे, लाठीकाठी, चित्रकला (विविध पेंटिंग्स), टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, संगीत, कराओके गायन इ. विषयक विद्यार्थ्यांना धडे देण्यातआले. अशाप्रकारच्या शिबीरात आम्हाला पहिल्यांदाच असे शिकायला मिळाले व खुप मजा आली. घरची आठवण सुद्धा आली नाही, असेच शिबीर पुन्हा व्हावेत असे मनोगत सारिका पंधरे, डिम्पल मरकाम यांनी व्यक्त केले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल संतोषवार होते तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रकल्प कार्यालयाचे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बघाडे, दिपक सपाटे व दिनेश इस्कापे उपस्थित होते.

सदर समारोपादरम्यान पालक सभेचे सुद्धा आयोजन करण्यात आले, आपल्या पाल्यांनी तयार केलेल्या कलाकृती साहित्य प्रदर्शनीमध्ये पालकांनी प्रत्यक्ष बघितल्याने पालकांचा आनंद सुद्धा द्विगुणित झाला. कार्यक्रमाचे संचालन महेश हातझाडे शिक्षक यांनी केले, अधिक्षक श्री. ब्रम्हानंद वाघमारे यांनी प्रास्तावीक मांडले तर कु. शिल्पा वाघमारे शिक्षिका यांनी मान्यवरांचे आभार मानले. सदर शिकवणी वर्ग तथा उन्हाळी शिबीराचे यशस्वीतेकरीता प्रशिक्षक नरेंद्र नैताम, लक्ष्मीकांत परतेती, नितेश राऊत तसेच शाळेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे विशेष योगदान लाभले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.